NSE 
अर्थविश्व

NSE International Exchange च्या माध्यमातून अमेरिकी शेअर्समध्ये गुंतवणूक

सुमित बागुल

भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. या आधी भारतीय गुंतवणूकदार काही मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या मदतीने अमेरिकी शेअर बाजारातील शेअर्स खरेदी विक्री करू शकत होते. मात्र आता ही गुंतवणूक अधिक सुकर आणि सोपी होणार आहे. NSE च्या गुजरातमधील इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटरमधील गिफ्ट सिटीच्या माध्यमातून आता अमेरिकी शेअर बाजारातील शेअर्स खरेदी आणि विक्री करणं अधिक सुकर होणार आहे.

ब्रोकर्सची नोंदणी सुरु
एनएसई इंटरनॅशनल एक्स्चेंज (NSE International Exchange) च्या माध्यमातून याबाबत महत्त्वाची माहिती पुरवण्यात आली आहे. सध्या या सिस्टीम अंतर्गत भारतीय गुंतवणूकदारांना कशा प्रकारे पायाभूत सुविधा देता येतील यावर काम सुरू आहे. सोबतच यासाठीच्या ब्रोकर्सची नोंदणी देखील सुरु झाली आहे.

'फ्रॅक्शनल बाइंग'ची सुविधा "
महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही या अंतर्गत 'फ्रॅक्शनल बाइंग ' म्हणजेच काही हिश्श्यांमध्ये देखील अमेरिकी शेअर मार्केटमधील लिस्टेड शेअर्सची खरेदी करू शकणार आहेत. सध्याच्या घडीला ज्यांना अमेरिकी शेअर बाजारातील शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल असे गुंतवणूकदार काही मान्यताप्राप्त ऑनलाईन ब्रोकर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकत होते. ऑनलाईन ब्रोकसरच्या माध्यमातून यूएस स्टॉकच्या दहा लाखांपर्यंत मालकीची परवानगी देण्यात येत होती.

क्लिअरिंग, सेटलमेंट कोण करणार ?
नव्या सुविधेअंतर्गत होणाऱ्या सर्व गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्याची जबाबाबरी ही आयएफएससी प्राधिकरणाच्या नियामक कार्यक्षेत्राअंतर्गत असणार आहे. यामध्ये शेअर्सची देवाण घेवाण, क्लिअरिंग, सेटलमेंट आणि होल्डिंग अशा सर्व प्रकारच्या बाबींचा समावेश असणार आहे. एनएसई आयएफएससीच्या एका प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. आयएफएससी प्राधिकरणाने त्याच्या नियामक सँडबॉक्स अंतर्गत ऑफरची सोय केली आहे जेथे खरेदीसाठी निधी हस्तांतरण आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस) द्वारे होईल, असेही त्यात म्हटले आहे.

किती रुपये गुंतवू शकतात ?
सध्याच्या घडीला , प्रत्येक भारतीयाला LRS अंतर्गत वार्षिक $ 250,000 पर्यंत परदेशी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. मात्र यावर काही निर्बंध देखील आहेत. सदर गुंतवणुकीसाठीची रक्कम ही लेव्हरेजिंग साठी वापरता येणार नाही. म्हणजे सोप्या भाषेत या मार्गाने कोणत्याही गुंतवणूकदाराला अमेरिकी शेअर्समध्ये ट्रेडिंग किंवा वायदे बाजारात ट्रेडिंग करता येणार नाही. या मार्गाने तुम्ही केवळ थेट शेअर्स खरेदी करू शकतात.

एनएसई आयएफएससी क्लिअरिंग कॉर्पोरेशन डिपॉझिटरी पावत्यांमध्ये या सर्व व्यापारांचे क्लिअरिंग आणि सेटलमेंट करेलसोबतच सेटलमेंटची हमी देखील देईल. याव्यतिरिक्त, हे व्यवहार एनएसई आयएफएससीच्या गुंतवणूकदार संरक्षण फ्रेमवर्क अंतर्गत समाविष्ट केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. या आधी भारतीय गुंतवणूकदार काही मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या मदतीने अमेरिकी शेअर बाजारातील शेअर्स खरेदी विक्री करू शकत होते. मात्र आता ही गुंतवणूक अधिक सुकर आणि सोपी होणार आहे. NSE च्या गुजरातमधील इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटरमधील गिफ्ट सिटीच्या माध्यमातून आता अमेरिकी शेअर बाजारातील शेअर्स खरेदी आणि विक्री करणं अधिक सुकर होणार आहे.

ब्रोकर्सची नोंदणी सुरु
एनएसई इंटरनॅशनल एक्स्चेंज (NSE International Exchange) च्या माध्यमातून याबाबत महत्त्वाची माहिती पुरवण्यात आली आहे. सध्या या सिस्टीम अंतर्गत भारतीय गुंतवणूकदारांना कशा प्रकारे पायाभूत सुविधा देता येतील यावर काम सुरू आहे. सोबतच यासाठीच्या ब्रोकर्सची नोंदणी देखील सुरु झाली आहे.

'फ्रॅक्शनल बाइंग'ची सुविधा "
महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही या अंतर्गत 'फ्रॅक्शनल बाइंग ' म्हणजेच काही हिश्श्यांमध्ये देखील अमेरिकी शेअर मार्केटमधील लिस्टेड शेअर्सची खरेदी करू शकणार आहेत. सध्याच्या घडीला ज्यांना अमेरिकी शेअर बाजारातील शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल असे गुंतवणूकदार काही मान्यताप्राप्त ऑनलाईन ब्रोकर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकत होते. ऑनलाईन ब्रोकसरच्या माध्यमातून यूएस स्टॉकच्या दहा लाखांपर्यंत मालकीची परवानगी देण्यात येत होती.

क्लिअरिंग, सेटलमेंट कोण करणार ?
नव्या सुविधेअंतर्गत होणाऱ्या सर्व गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्याची जबाबाबरी ही आयएफएससी प्राधिकरणाच्या नियामक कार्यक्षेत्राअंतर्गत असणार आहे. यामध्ये शेअर्सची देवाण घेवाण, क्लिअरिंग, सेटलमेंट आणि होल्डिंग अशा सर्व प्रकारच्या बाबींचा समावेश असणार आहे. एनएसई आयएफएससीच्या एका प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. आयएफएससी प्राधिकरणाने त्याच्या नियामक सँडबॉक्स अंतर्गत ऑफरची सोय केली आहे जेथे खरेदीसाठी निधी हस्तांतरण आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस) द्वारे होईल, असेही त्यात म्हटले आहे.

किती रुपये गुंतवू शकतात ?
सध्याच्या घडीला , प्रत्येक भारतीयाला LRS अंतर्गत वार्षिक $ 250,000 पर्यंत परदेशी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. मात्र यावर काही निर्बंध देखील आहेत. सदर गुंतवणुकीसाठीची रक्कम ही लेव्हरेजिंग साठी वापरता येणार नाही. म्हणजे सोप्या भाषेत या मार्गाने कोणत्याही गुंतवणूकदाराला अमेरिकी शेअर्समध्ये ट्रेडिंग किंवा वायदे बाजारात ट्रेडिंग करता येणार नाही. या मार्गाने तुम्ही केवळ थेट शेअर्स खरेदी करू शकतात.

एनएसई आयएफएससी क्लिअरिंग कॉर्पोरेशन डिपॉझिटरी पावत्यांमध्ये या सर्व व्यापारांचे क्लिअरिंग आणि सेटलमेंट करेल. सोबत सेटलमेंटची हमी देखील देईल. याव्यतिरिक्त, हे व्यवहार एनएसई आयएफएससीच्या गुंतवणूकदार संरक्षण फ्रेमवर्क अंतर्गत समाविष्ट केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

Kolhapur Weather: कोल्हापुरात मध्यरात्री तापमान १४ अंश सेल्सिअसवर! दाट धुक्यात हरवले शहर, नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

SCROLL FOR NEXT