gold prices will be increase in Diwali goes upto 40 thousand  
अर्थविश्व

Diwali 2022 : दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांची विक्रमी सोनं खरेदी; आकडा ऐकून व्हाल आवाक्

दिवाळीच्या ४ दिवसात सोन्याची विक्री तेजीत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : दिवाळीच्या सणामुळं सराफ व्यापाऱ्यांची चांदी झाली आहे. कारण यंदा दिवाळीच्या मुहुर्तावर पुणेकरांनी तब्बल १०० कोटी रुपयाचं सोनं खरेदी केलं आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी ही माहिती दिली. (Diwali 2022 Record buying of gold of 100 crore rupees by Pune People)

दिवाळीच्या सणामध्ये पाडव्याच्या दिवशी सोन-चांदी खरेदीची परंपरा आहे. त्यामुळं दिवाळीचा काळ हा सराफ व्यापाऱ्यांसाठी वर्षातला सर्वात मोठा सिझन असतो. बाजारात क्रयशक्ती कायम रहावी यासाठी सोन्याचे दरतही चांगलीच कपात झाली होती. 53 हजारावर गेलेलं सोनं 49 हजारापर्यंत खाली आल्यामुळं साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्यानिमित्त पुणेकरांनी सोन्याला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली.

यंदा एकूणच पाऊसमान चांगलं राहिल्यानं आणि त्यामुळं बाजारात तेजी होती. त्याचाच परिणाम सोन खरेदीवरही पहायला मिळाला. त्यामुळं यंदाच्या दिवाळीत शहरात अंदाजे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी झाली. यंदाची दिवाळी ही सोनं-चांदी व्यापाऱ्यांसाठी गोड झाल्याचं फत्तेचंद रांका यांनी सांगितलं.

पुणे शहरात सोन्याची एकूण बाराशे दुकाने असून यावर्षी सगळ्याच दुकानात मोठी गर्दी दिसून आली याद्वारे पुणेकरांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला असल्याचं देखील रांका यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

Pune News: वाहनांची तपासणी आता अवघ्या सहा मिनिटांत;‘आरटीओ’चे स्वयंचलित चाचणी केंद्र एक मार्चपासून सेवेत, वेळेची हाेणार बचत!

Dive Ghat Pune Traffic Update: दिवेघाटात उद्या दोन तास वाहतूक बंद; आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील रुंदीकरणासाठी निर्णय!

SCROLL FOR NEXT