Stock Market News | Todays Sensex and Nifty Updates google
अर्थविश्व

आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित घसरण

गेल्या आठवड्याच्या प्रारंभीस सेन्सेक्स आणि निफ्टीचे अंक वधारले होते. या आठवड्याच्या प्रारंभीस मात्र स्थिती बदलली.

नमिता धुरी

Todays Share Market News : आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात किंचित घसरण दिसून आली. सेन्सेक्स ६७.०९ अंकांनी म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी घसरला व ५२,८६०.१५ अंकांवर स्थिर होत बाजार सुरू झाला. निफ्टी १९.१० अंकांनी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी वधारला व १५,७५२.४० अंकांवर स्थिर झाला.

दोन आठवड्यांपूर्वी पहिल्याच दिवशी सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला होता. त्यानंतर गेल्या आठवड्याच्या प्रारंभीस सेन्सेक्स आणि निफ्टीचे अंक वधारले होते. या आठवड्याच्या प्रारंभीस मात्र स्थिती बदलली. (Todays Stock Market Updates)

गेल्या काही आठवड्यांच्या घसरणीनंतर मागच्या आठवड्यात बाजार हिरव्या रंगात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. यातऑटो सेक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच वस्तूंच्या किमतीतही सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, बीएसई मेटल, बीएसई एनर्जी आणि बीएसई ऑइल अँड गॅसने तुलनेने कमजोर प्रदर्शन केले.

दुसरीकडे, विंडफॉल टॅक्सच्या बातम्यांमुळे एनर्जी शेअर्समध्ये बरीच घसरण दिसली. एनर्जी इंडेक्स जवळपास 4 टक्क्यांनी घसरला. सर्वात जास्त दबाव पीएसई, मेटल शेअर्सवर होता, त्यानंतर एफएमसीजी, रियल्टी, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये रिकव्हरी दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT