अर्थविश्व

अखेर टेस्लाची भारतात एंट्री; बंगळूरमध्ये होणार संशोधन आणि विकास केंद्र

वृत्तसंस्था

अहमदाबाद - इलेक्ट्रिक कारच्या निर्मिती क्षेत्रातील आघाडीची अमेरिकी कंपनी टेस्लाने अखेर भारतामध्ये एंट्री केली आहे. कर्नाटकातील बंगळूरमध्ये या कंपनीचे पहिले पाऊल पडले आहे.  टेस्लाने बंगळूरमध्ये संशोधन आणि विकास केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाच्या भारतातील आगमनानंतर आज ट्विटरवर विनोद आणि मेमेज यांचा अक्षरशः महापूर आला होता. देशातील ट्रॅफिक जॅमची समस्या आणि रस्त्यांची दुरवस्था यावर मिश्‍कील भाष्य करणारे ट्विट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

यांच्याकडे नेतृत्व
टेस्ला इंडियाचे नेतृत्व हे वैभव तनेजा, व्यंकटरमन श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेइनस्टाइन यांच्याकडे आहे. तनेजा हे कंपनीचे मुख्य लेखाअधिकारी आहेत.  फेइनस्टाइन यांच्याकडे कंपनीच्या जागतिक व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आधीच होणार होती एंट्री
टेस्लाने २०१६ मध्येच भारतात प्रवेश करण्याचे नियोजन आखले होते पण तेव्हा हे शक्य झाले नाही. कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी देशातील नियामक यंत्रणेवर खापर फोडताना भारतात येणे टाळले होते.

या नावाने नोंदणी
‘रजिस्ट्रार ऑफ कंपनीज’कडे टेस्लाने अधिकृत नोंदणी देखील केली आहे. टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लि. या नावाने कंपनीची नोंदणी करण्यात आली आहे, असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

‘मॉडेल-३’ भारतामध्ये?
या गाडीच्या किंमतीचा विचार केला तर टेस्लाचे ‘मॉडेल-३’ ची भारतामध्ये विक्री केली जाऊ शकते. या गाडीची किंमत साधारणपणे ७४ हजार डॉलर (५९ लाख २० हजार रूपये) एवढी असू शकते असे ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. याच कंपनीच्या छोट्या एसयूव्ही आणि मॉडेल- वायच्या गाड्याही भारतामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अन्यत्रही विस्तार
बंगळूर व्यतिरिक्त देशाच्या अन्य भागांमध्ये टेस्ला विक्री केंद्रे सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांची कंपनीच्या व्यवस्थापनासोबत बोलणी सुरू आहे. व्यवसाय वृद्धीसाठी कंपनीने स्थानिक पातळीवर देखील भागीदारी करण्याचे नियोजन आखले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT