Money
Money esakal
अर्थविश्व

31 मार्चपूर्वी ही पाच महत्त्वाची कामे उरका अन्यथा...

सकाळ डिजिटल टीम

ही कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील आर्थिक वर्षात अडचण निर्माण होऊ शकते.

मार्च महिना अर्धा संपला आहे, आता हा महिना फक्त काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे 2021-22 हे वर्ष संपणार आहे. चला जाणून घेऊया की, 31 मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नाही, तर अनेक आर्थिक कामांची अंतिम मुदत देखील आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील आर्थिक वर्षात अडचण निर्माण होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या कामांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण करावेत.

1. आधार-पॅन लिंकिंग डेडलाइन-

आधार आणि पॅन क्रमांक (PAN-Aadhaar linking deadline) लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. जर तुम्ही अद्याप असं केलं नसेल तर 31 मार्चपूर्वी तुम्ही आधार आणि पॅन लिंक करू शकता. असे न केल्यास पॅन क्रमांक अवैध ठरेल. आपण ई-फायलिंग वेबसाइट किंवा UIDPAN 567678 किंवा 56161 वर पाठवून दोन्ही लिंक करू शकता. त्याचबरोबर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि UTIITSLच्या पॅन सेवा केंद्रांद्वारे ऑफलाइनही जोडता येणार आहे.

2. विलंबित या संशोधित आई.टी.आर.-

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयटीआर (ITR) भरण्याची शेवटची तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने अखेर 31 डिसेंबर 2021 ची अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र, तोपर्यंत आयटीआर भरता आला नाही तर 31 मार्च 2022 पर्यंत रिटर्न भरता येईल. परंतु विलंबित (Belated) आयटी रिटर्न भरताना करदात्यांना अतिरिक्त करांसह दंडही भरावा लागणार आहे.

3. बँक खाते केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख-

भारतीय रिझर्व्ह बँकेने KYC पूर्ण करण्याची मुदत 31 डिसेंबर 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. आरबीआयने (RBI)वित्तीय संस्थांना 2021-22 या चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँक केवायसी अपडेटसंदर्भात कोणतीही कारवाई न करण्याचा सल्ला दिला आहे. केवायसी अंतर्गत बँक ग्राहकांना त्यांचे पॅनकार्ड, पत्ता जसे की आधार, पासपोर्ट आदी अपडेट करून घेण्यास सांगते. याबरोबरच अलीकडील फोटोज आणि इतर माहितीही मागवली जाते.

4. आर्थिक वर्ष 2021-22 साठी करबचतीची कसरत-

जर तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 साठी जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडला असेल, तर 31 मार्च 2022 पर्यंत तुम्ही तुमची करबचतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे याची खात्री करून घ्या. याचा अर्थ असा आहे की करदात्यांना हे सुनिश्चित करावे लागेल की त्यांनी सर्व विभागांतर्गत उपलब्ध असलेल्या डिडक्शनचा लाभ घेतला आहे. नियमाप्रमाणे साधारणतः उपलब्ध डिडक्शनमध्ये कलम 80C मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत, एनपीएस अंशदानासाठी कलम 80CCD (1बी) अंतर्गत ५० हजार रुपये कर लाभ, वैद्यकीय विमा प्रीमियमवर 50 हजार रुपये कर लाभ इत्यादींचा समावेश आहे.

5. पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर हे काम करा-

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) या खात्यांमध्ये तुमचे खाते असेल आणि चालू आर्थिक वर्षात तुम्ही या खात्यांमध्ये एकही पैसा जमा केला नसेल तर किमान आवश्यक रक्कम 31 मार्च 2022 पर्यंत टाकावी. अन्यथा, त्यांना पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. लक्षात घ्या की आर्थिक वर्ष 2021-22 पासून, एखादी व्यक्ती जुन्या किंवा विद्यमान कर प्रणालीचा पर्याय निवडू शकते आणि विद्यमान कर सूट आणि वजावटीचा लाभ घेऊ शकते. जरी आपण नवीन कर प्रणालीची निवड केली तरीही खाते अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी आवश्यक किमान योगदान आपण जमा केले आहे की नाही याची खात्री करणे अद्याप महत्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT