Chemical Stocks sakal
अर्थविश्व

Chemical Stocks : 3 वर्षात एक लाखाचे 21 लाख, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

या शेअरमध्ये तीन वर्षांपूर्वी कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तो लाखांचा मालक झाला असता.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळात श्रीमंत केले आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

या शेअरमध्ये तीन वर्षांपूर्वी कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तो लाखांचा मालक झाला असता.

आम्ही ज्या स्टॉकबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे फायनोटेक्स केमिकल (Fineotex Chemical Ltd). फायनोटेक्स केमिकल लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना सातत्याने उत्कृष्ट परतावा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी या शेअरची किंमत सुमारे केवळ 15 रुपये होती, पण आज त्याचे शेअर्स 316 रुपयांवर पोहोचले आहेत.

याचा अर्थ या शेअरने आतापर्यंत त्यांच्या गुंतवणूकदारांना 2000 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. मात्र, गेल्या एका महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकवर प्रॉफीट बुकिंगचा दबाव कायम आहे. या दरम्यान, त्यात 10 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

मात्र गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेअरची किंमत 180 रुपयांवरून 316 रुपये प्रति शेअर झाली आहे. गेल्या एका वर्षात शेअर 105 रुपयांवरुन 316 रुपयांपर्यंत वाढला आहे.

गेल्या तीन वर्षातील त्याची वाढ बघितली तर जर कोणी त्यात एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 21 लाख रुपये मिळाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 3 लाख रुपये मिळाले असते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT