Successful Investor
Successful Investor Sakal
अर्थविश्व

Successful Investor|'स्मार्ट गुंतवणूकदार' होण्याच्या पाच टिप्स

सकाऴ वृत्तसेवा

ज्याच्याकडे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असतात आणि जो दीर्घकाळात संपत्तीचा संचय करतो, तोच 'स्मार्ट गुंतवणूकदार' बनतो.

यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी अर्थशास्त्र किंवा उच्च शिक्षितच असायला पाहिजे, असे नाही. गुंतवणुकीतील फायद्याच्या गोष्टी ज्याला ओळखता येतात ती व्यक्ती स्मार्ट गुंतवणूकदार बनू शकते. गुंतवणूक करण्यासाठी सातत्याने उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करतो तो स्मार्ट गुंतवणूकदार अशी ओळख निर्माण करत असतो. ज्याच्याकडे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असतात आणि जो दीर्घकाळात संपत्तीचा संचय करतो, तोच 'स्मार्ट गुंतवणूकदार' बनतो. अनेक जण जिथे पैसा गुंतवत आहेत, तिथे स्मार्ट गुंतवणूकदार पैसे गुंतवत नाहीत, त्याऐवजी ते बाजाराबद्दल जाणून घेतात. स्मार्ट गुंतवणूकदार कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करतात.

तुम्हाला अधिक स्मार्ट गुंतवणूकदार कसे होता येईल? असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर या लेखातून तुम्हाला त्याची उत्तर मिळतील. कोणतीही स्मार्ट गोष्ट जशी तंत्रज्ञानाला जोडलेली आहे, तसे तुम्हीही तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन 'स्मार्ट गुंतवणूकदार' होऊ शकता. एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी यांनी 'स्मार्ट गुंतवणूकदार' होण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत, चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत.

स्टॉकब्रोकिंगचे अ‍ॅप डाउनलोड करा : तुमच्या स्मार्टफोनवर स्टॉकब्रोकिंगचे अ‍ॅप डाउनलोड करुन घ्या. तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल, तर तुम्ही तुमचा गुंतवणूक प्रवास अ‍ॅपवर झटपट अकाउंट उघडून करू शकता आणि किमान ब्रोकरेज शुल्कासारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. गुंतवणूक आणि ट्रेडिंगसाठी मोबाइल अ‍ॅप वापरण्याचा फायदा म्हणजे तुम्ही येता-जाता बाजाराचा माग ठेवू शकता.

पहिली गुंतवणूक करू शकता : एकदा अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही एखाद्या रुल-बेस्ड इन्व्हेस्टमेंट इंजिनसारखे डिजिटल सोल्युशन वापरून बघू शकता आणि त्याद्वारे तुमची पहिली गुंतवणूक करू शकता. रुल-बेस्ड इन्व्हेस्टमेंट इंजिन काही नियमांच्या आधारे स्टॉक्सची शिफारस करते. यात मानवी पूर्वग्रह टाळले जातात. यामुळे जोखीम किमान पातळीवर राहते आणि मोबदला जास्तीत-जास्त मिळवता येतो.

डिजिटल ब्रोकर्सच्या ब्रोकिंग अ‍ॅप्सशी एकात्मीकरण करा : अत्यंत स्मार्ट गुंतवणूकदार होण्याच्या दिशेने चढण्याची तिसरी पायरी म्हणजे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ उभा करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये पैसा गुंतवण्यासाठी डिजिटल ब्रोकर्सच्या ब्रोकिंग अ‍ॅप्सशी एकात्मीकरण करता येईल, असा वेगळा थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म वापरणे होय. आधुनिक गुंतवणूक उत्पादने तुम्हाला कमी खर्चातील, दीर्घकालीन पोर्टफोलिओ तयार करण्याची मुभा देतात. इक्विटीजमध्ये गुंतवणूक करण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी हा एक आहे.

नफा कमावण्यात मदत होऊ शकते : स्टॉकब्रोकिंग अ‍ॅप्स वापरण्याचा आणखी एक लाभ म्हणजे बाजाराबाबत सातत्याने दक्ष राहता येते. दररोजच्या कामांमध्ये बाजाराचा माग ठेवणे आव्हानात्मक होऊ शकते, पण अ‍ॅपद्वारे महत्त्वाच्या घटनांचे अ‍ॅलर्टस् (इशारे) प्राप्त होत असतील, तर तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत होऊ शकते. अ‍ॅलर्टसचा वापर चातुर्याने केला, तर ते तुम्हाला अद्ययावत ठेवून नफा कमावण्यात मदत करू शकतात.

डिजिटल ब्रोकर्स गुंतवणुकीचे शिक्षण देणारे प्लॅटफॉर्म्स : अखेरची पायरी म्हणजे डिजिटल ब्रोकर्स गुंतवणुकीचे शिक्षण देणारे प्लॅटफॉर्म्सही पुरवतात. हे प्लॅटफॉर्म्स म्हणजे वित्तीय बाजारांबद्दलचे सर्वसमावेशक मार्गदर्शन असते. नव्याने गुंतवणूक करायला लागलेल्यांपासून ते प्रस्थापित गुंतवणूकदारांपर्यंत कोणीही या प्लॅटफॉर्मवर जॉइन होऊ शकते आणि भांडवली बाजारात पैसा गुंतवण्याच्या मार्गांचे शिक्षण घेऊ शकते. आपण व्यवसायाच्या मुलभूत तत्त्वांपासून ते ट्रेडिंगच्या व्यूहरचनांपर्यंत बाजाराची कार्यपद्धती येथे पूर्णपणे शिकू शकतो.या काही साध्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही 'व्हेरी स्मार्ट गुंतवणूकदार' होऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT