diwali gold 
अर्थविश्व

Gold Prices: सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या भावात वाढ झाली तर चांदीचे भाव कमी झाले आहेत. एमसीएक्समधील सोन्याचे वायदे 0.07 टक्क्यांनी वाढून 50 हजार 635 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदी 0.2 टक्क्यांनी घसरून 62 हजार 615 रुपये प्रति किलो झाली.

मागील सत्रात सोने 0.76 टक्के म्हणजेच प्रति १० ग्रॅमला 380 रुपये तर चांदी प्रतिकिलोला 0.28 टक्क्यांनी वाढली होती. भारतात या आठवड्यात असलेल्या धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने सोने-चांदीची विक्री वाढेल अशी विश्लेषकांची अपेक्षा आहे. 2020च्या ऑगस्टमध्ये सोने 56 हजारांच्या वर विक्रमी पातळीवर गेले होते.

धनत्रयोदशीनिमित्त सोने विक्री वाढली-
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे (डब्ल्यूजीसी) व्यवस्थापकीय संचालक (भारत) सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, फूटफॉल चांगला आहे आणि लोक सोने खरेदीत रस घेत आहेत. विक्री सुधारत आहे, पण मागील वर्षीच्या एकाच तुलनेत ही खरेदी काही प्रमाणात कमी आहे.

ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष अनंत पद्मनाभन म्हणाले की, दागिन्यांची बाजारपेठ हळूहळू सावरत आहे आणि ग्राहकांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. पद्मनाभन पुढे म्हणाले की, यंदा दोन दिवस धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. 13 नोव्हेंबरला देशभरात जास्तीत जास्त सोने-चांदीचे व्यवहार होतील अशी अपेक्षा आहे. 

विक्रीत सुधारणा-
जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव आज स्थिर होता. जगभरात कोरोना रुग्ण वाढत असताना, नव्याने निर्बंध लादण्याच्या भीतीचा आर्थिक बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो. स्पॉट सोने प्रति औंस 1876.92 डॉलरपर्यंत स्थिर होते, पण या आठवड्यात तो 3.8 टक्क्यांनी घसरला, ही सप्टेंबर अखेरीनंतरची कामगिरी सर्वात वाईट होती. आज इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.1 टक्क्यांनी वाढून 24.26 डॉलर प्रति औंस झाली आहे.

31 टक्क्यांनी वाढले दर- 
भारतात 2020 मध्ये जागतिक पातळीनुसार सोन्याच्या किमती 31 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑगस्टमध्ये भारतात सोन्याच्या दराने 56 हजार 200 चा विक्रमी उच्चांक गाठला, तर चांदी प्रति किलो 80 हजारांपर्यंत गेल्या रुपयांच्या आसपास होती. सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची मागणी वाढेल अशी आशा विश्लेषकांनी व्यक्त केली.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 320 अंकांनी खाली; तर Nifty 25,250 अंकांवर; कोणते शेअर्स घसरले?

Vaibhav Suryavanshi : वैभवने पटकावले 'त्या' सात भारतीय अन् जगातील ३५ खेळाडूंमध्ये 'अव्वल' स्थान; मोडला शुभमन गिलचा विक्रम

‘योग्य वेळ आली की बोलेन’ विजयसोबतच्या लग्नाबद्दल रश्मिका पहिल्यादाच बोलली, म्हणाली...

Viral Video: ती घाबरली होती… अन् तेव्हाच पुणे पोलिस पुढे आले; एका व्हिडिओने जिंकली सर्वांची मने

Lanja Crime : घरात आढळला सडलेला मृतदेह; डाव्या हातावर मोठी जखम, पाच दिवसांपासून लेक करत होती फोन, पण..; घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT