Today's Gold Silver Price Sakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Diesel Price today 15th May 2022: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला लग्नासाठी सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत झालेली घसरण बघता ही बातमी मिळाली आहे. BankBazaar.com नुसार, सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोने 47,230 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर 24 कॅरेट सोने 49,590 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे.

सोन्याच्या किमतीत घसरण-

BankBazaar.com नुसार, सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. सराफा बाजारात काल 22 कॅरेट सोने 47,330 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. आज सोन्याचा भाव 47,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झाल्यास आज 49,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची किंमत-

चांदीच्या किमतीत आज घट झाली आहे. म्हणजेच चांदीचा दर आज प्रतिकिलो 63,700 रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT