Todays Gold and silver prices sakal
अर्थविश्व

रक्षाबंधनच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

आज रक्षाबंधन असल्याने सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल असणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Gold silver price: आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. मात्र बुधवारी सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. आज रक्षाबंधन असल्याने सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल असणार आहे त्यामुळे सोने चांदीचे दर महागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज ऐन रक्षाबंधनच्या दिवशी सोने चांदीच्या दर घसरले आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. (gold silver price update on 11 august 2022)

आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,350 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,650 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 587 रुपये आहे

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 53,380 रुपये

दिल्ली - 51,870 रुपये

हैदराबाद - 51,650 रुपये

कोलकत्ता -51,650 रुपये

लखनऊ - 51,870 रुपये

मुंबई - 51,650 रुपये

नागपूर - 51,690 रुपये

पूणे - 51,690 रुपये

देशात येणार 'वन गोल्ड वन रेट' योजना

देशात 'वन गोल्ड वन रेट' योजना लागू करण्याची मागणीला जोर धरलाय कारण हेच सोने दिल्लीत दुसऱ्या दराने विकले जाते, नंतर पटण्यात दुसऱ्या दराने. तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत तुम्हाला सोन्याच्या किमतीत मोठी तफावत दिसेल.

सोने तेच आहे आणि सोन्याची शुद्धताही तीच आहे. कारण बंदरातून सोने आयात करुन उतरवले जाते, तेथून वेगवेगळ्या राज्यांत पाठवले जाते. शिपिंग खर्च इत्यादी जोडल्यानंतर सोन्याची किंमत बदलते. मात्र, आयातीच्या वेळी सोन्याची किंमत समान असते. त्यामुळे येत्या काळात देशात 'वन गोल्ड वन रेट' येण्याच्या हालचाली सुरू आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT