gold silver price sakal
अर्थविश्व

सणावारांमध्ये खरेदीदारांची मेजवानी! सोने-चांदीत घसरण सुरुच, जाणून घ्या नवे दर

आजही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold-silver Price: गेल्या मागील आठवड्यापासून सोने चांदीच्या किंमतीत प्रचंड घसरण दिसून येत आहे. विशेषत: सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण दिसून येत आहे. आजही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,230 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 549 रुपये आहे. (gold silver price update 24 august 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 52,400 रुपये

दिल्ली - 51,440 रुपये

हैदराबाद - 51,230 रुपये

कोलकत्ता -51,230 रुपये

लखनऊ - 51,440 रुपये

मुंबई - 51,230 रुपये

नागपूर - 51,260 रुपये

पूणे - 51,260 रुपये

सोन्याच्या आयातीत वाढ

एप्रिल ते जुलै 2022 या काळात सोन्याची आयात गेल्या वर्षातील याच काळाच्या तुलनेत 6.4 टक्क्यांनी वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत, म्हणजेच एप्रिल ते जुलै या काळात 12.9 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच काळात 12 अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले होते. सोन्याच्या किरकोळ मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे सोन्याची आयात वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : पुढच्या वेळी आदित्य ठाकरेंना दावोसला नेतो - फडणवीस

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT