Todays Gold Silver Update
Todays Gold Silver Update  sakal
अर्थविश्व

Gold Silver Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे. अगदी नवरात्री जवळ असताना सोन्याच्या दरात घट झाल्याने सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येईल.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,430 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 615 रुपये आहे. (gold silver price update 25 september 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 50,730 रुपये

दिल्ली - 50,350 रुपये

हैदराबाद - 50,200 रुपये

कोलकत्ता - 50,200 रुपये

लखनऊ - 50,350 रुपये

मुंबई - 50,200 रुपये

नागपूर - 50,230 रुपये

पूणे - 50,230 रुपयेये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT