gold esakal
अर्थविश्व

Gold-Silver Price: ऐन नवरात्रीत सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

आज सोन्याचा भाव स्थिर दिसून येत असून चांदीचा दरात कपात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. नवरात्रीत सोने चांदीचे दर अचानक घसरल्याने सोने खरेदी करणाऱ्यांकडे कल दिसून येत आहे. बुधवारीसुद्धा सोने चांदीचे दर घसरलेले दिसून आले मात्र आज सोन्याचा भाव स्थिर दिसून येत असून चांदीचा दरात कपात झाली आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 49,970 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 550 रुपये आहे. (gold silver price update 28 september 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 50,450 रुपये

दिल्ली - 50,130 रुपये

हैदराबाद - 49,970 रुपये

कोलकत्ता - 49,970 रुपये

लखनऊ - 50,130 रुपये

मुंबई - 49,970 रुपये

नागपूर - 50,000 रुपये

पूणे - 50,000 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

काय? १६७.२ कोटींना विकलं गेलं ‘यशोदा-श्रीकृष्ण’ चित्र, यात नक्की विशेष काय? Viral

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT