Gold prices sakal
अर्थविश्व

Gold Silver Price: सोने चांदी महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज सोने चांदीच्या दरात वाढ दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून येत होती. आज सोने चांदीच्या दरात वाढ दिसत आहे. सध्या गणेशोत्सवामुळे सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,900 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,160 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 539 रुपये आहे. (gold silver price update 7 september 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 51,820 रुपये

दिल्ली - 51,320 रुपये

हैदराबाद - 51,160 रुपये

कोलकत्ता - 51,160 रुपये

लखनऊ - 51,320 रुपये

मुंबई - 50,160 रुपये

नागपूर - 51,190 रुपये

पूणे - 51,190 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT