today gold prices 
अर्थविश्व

सोनं खरेदीची मोठी संधी, नऊ महिन्यातील सर्वाधिक सूट

नामदेव कुंभार

Highest discount in gold prices in India : सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. भारतातील व्यापारी आणि डिलर यांनी सोनं खरेदीवर मोठी सूट दिली आहे. मागील नऊ महिन्यातील सर्वात मोठी सूट असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना महामारीमुळे मोठ्या कालावधीपर्यंत बाजारपेठ बंद असल्यामुळे ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हा फंडा अवलंबला आहे. कोरोना महामारीमुळे बाजर बंद होते त्यामुळे स्थानिक मार्टेकमध्ये सोन्याची मागणी कमी झाली. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी सोन्यावर सूट देण्यात आली.

प्रति औंस 12 डॉलरची सूट -

विदेशात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली पण स्थानिक बाजारपेठेत मागणी घटली आहे, त्यामुळेच सोने खरेदीवर व्यापाऱ्यांकडून मोठी सूट दिली जात असल्याचं सोनं आयात करणाऱ्या मुंबईतील सर्राफा डिलरने रॉयटर्सला सांगितलं. डिलरने 12 डॉलर प्रति औंसपर्यंत सूट दिली आहे, जी सप्टेंबर 2020 नंतरची सर्वाधिक सू आहे. यामध्ये 10.75% आयात आणि 3% विक्री शुल्काचा समावेश आहे. याआधी गेल्या आठवड्यात मार्केटने 10 डॉल प्रित औंस सूट दिली होती.

डिस्काउंटनंतर ऑर्डर नाही -

मोठ्या डिस्काउंटनंतरही ग्राहक खरेदीसाठी ऑर्डर देत नसल्याचं डिलरने सांगितलं. काही राज्यात लॉकडाउनचे अद्याप कडक निर्बंध आहेत. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत नाही. काही राज्यात निर्बंध शिथिल हो आहेत, अशा ठिकाणी ग्राहक थोड्याप्रमाणात दुकानाकडे जात आहेत. रॉयटर्सच्या एका रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये सोन्याच्या डिलरने आंतरराष्ट्रीय किंमतीवर प्रित औंस $ 20- $ 50 इतकी सूट दिली आहे. गेल्या आठवड्यात ही सूट $6- $7 इतकी होती.

अमेरिकेत शुक्रवारी अमेरिकेत सोनं महागलं -

एमकेएस, ग्रेटर चायनाचे स्थानिक अध्यक्ष बर्नार्ड सिन यांन रॉयटर्सला सांगितलं की, गुआंगझोउमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कडक लॉकडाउन लावण्यात आला. या लॉकाउनने सोन्याच्या निर्मिती क्षेत्रांनाही प्रभावित केलं. त्यातच नॉनफार्म पेरोलमध्ये अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही. त्यामुळेच दोन आठवड्यानंतर अमेरिकेत शुक्रवारी सोन्याच्या दरांमध्ये वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी अमेरिकेत सोन्याची किंमत एक टक्क्यांनी वाढली.

Gold Exchange

डिस्काउंट का?

मोतीलाल ओसवाल फा/नेंशियल सर्विसेजचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, अमेरिकेतील अर्थव्यस्थेसोबत मिळालेल्या सकारात्मक आंकड्यामुळे डॉलर आणि बॉन्ड यील्डला आधिक मजबूती मिळाली. त्यामुळेच सोन्याच्या किंमतीध्ये घसरन पाहायला मिळत आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजमध्ये वरिष्ट अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, ''अमेरिकेचा प्रायव्हेट पेरोल डेटा अपेक्षापेक्षा जास्त चांगला राहिल्यामुळे इंडेक्समध्ये वाढ पाहायला मिळाली. त्याचा सोन्याच्या दरांवर परिणाम दिसून आला.

शुक्रवारी भारतात सोन्याच्या किंमतीत घसरण -

शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा 388 रुपयानी स्वस्त झालं होतं. सोन्याच्यी किंमत प्रतितोळा 47,917 रुपये झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT