प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगल्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात.
प्रत्येक पालक (Parents) आपल्या मुलांना चांगल्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे अनेकदा त्यांचेच भविष्य धोक्यात येते. चांगल्या शाळा-कॉलेजांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी ते मेहनत घेतात. समर कॅम्प, क्रिकेट किंवा डान्स हे शिकण्यासाठी वेगळा खर्च करतात. उच्च शिक्षणाचा (Education) विचार केला तर किती खर्च होईल याचा विचार आपले आई-वडील कधीच करत नाही. अगदी मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते कर्ज (Loan) काढतात, जेणेकरुन आपलं मूल शिकून मोठं व्हावं. ते आपल्या मुलांच्या लग्नासाठीही पैसे साठवून ठेवतात. परंतु अशावेळी अनेकदा या पालकांना रिटायरमेंटवेळी (Retirement) बचत कमी असण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
पैशाचा विचार करावा लागतो:
आई-वडील हे रिटायरमेंटच्या काळात एक-एक करून पैशाचा विचार करत असतात. तर तुमचे आईवडील रिटायरमेंटवेळी आरामात जगावे त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी लवकरात लवकर हात पुढे करा. ते पुरेशी बचत करत आहेत का? ते गुंतवणूक (Investment) करत आहेत का? त्यांची कागदपत्रे योग्य आहेत का? त्यांच्यासाठी रिटायरमेंटचा कॉरपस तयार करण्यास मदत करण्यापासून ते त्यांच्या पोर्टफोलिओवर पुन्हा काम करण्यापर्यंत, जर तुम्ही त्यांना मानसिक दिलासा दिलात, तर ती त्यांच्यासाठी तुमची सर्वात मोठी भेट असेल.
पालकांचा आर्थिक भार वाटून घ्या:
जर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांनी सुखी आणि आरामदायी रिटायरमेंटचे जीवन जगावे असे वाटत असेल, तर त्यांचा आर्थिक भार वाटून घ्या. याची सुरुवात उच्च शिक्षणापासून होऊ शकते. जिथे प्रेमात ते त्यांच्या बचतीतून सर्व किंमत मोजायला तयार असतात. त्याचबरोबर रोजचा खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम काम शोधण्याची जबाबदारी मुलांची आहे. मुले ज्वॉंइट एज्युकेशन लोन (Education Loan) ही घेऊ शकतात. यामध्ये पालकांना सह कर्जदार (को-बॉरोअर) करावे लागतात. एकदा नोकरी मिळाली की किंवा कोर्स पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांनी ते हे कर्ज स्वतःहून फेडू शकतात.
घरखर्चावर मदत करून टॅक्समध्ये बचत करा:
जर तुम्ही नोकरी (Job) करत असाल तसेच आई-वडिलांसोबत राहत असाल तर घराच्या खर्चात हातभार लावणं योग्य ठरेल. तुम्ही तुमच्या आईवडिलांना त्यांच्या रिटायरमेंटसाठी जितके जास्त बचत करू द्याल, तितके ते तुमच्यावर कमी अवलंबून असतील. खर्चाला हातभार लावण्याचाही टॅक्स हा एक योग्य मार्ग आहे.
एका छोट्या घरात शिफ्ट व्हा:
जर तुमच्या पालकांची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर तुम्ही काही दुसरे पर्यायही शोधू शकता. राहण्यासाठी छोट्या घरात शिफ्ट होणं हे त्यापैकीच एक. यामुळे राहणीमानाचा खर्च तर कमी होईलच, शिवाय मोठे घर (House) विकण्याचा खर्च आणि छोट्या घराची किंमत यातील फरकातून मोठा कॉरपस उभा करण्यासही त्यांना मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.