IL-and-FS
IL-and-FS 
अर्थविश्व

'आयएल अँड एफएस' विकणार 'ओटीपीसी'तील २६ टक्के हिस्सा

पीटीआय

आर्थिक संकटात सापडलेली आयएल अँड एफएस आपली मालमत्ता विकून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करते आहे. ओटीपीसीतील (ओएनजीसी त्रिपुरा पॉवर कंपनी) आपला २६ टक्के हिस्सा विकण्यासाठी आयएल अँड एफएसने प्रस्ताव मागवले आहेत. आयएफआयएन आणि आयईडीसीएल, ओटीपीसीत होल्डिंग कंपन्या आहेत. आयएल अँड एफएसकडे आयएफआयएन आणि आयईडीसीएलचा २६ टक्के हिस्सा आहे. हा हिस्सा विकण्यासाठी आयएल अँड एफएसने एक्सप्रेशन्स ऑफ इंटरेस्ट (ईओआय) म्हणजेच प्रस्ताव मागवले आहेत. 

आयई़डीसीएलचे १२.०३ टक्के आणि आयएफआयएनचे १३.९७ टक्के शेअर आयएल अँड एफएसकडे आहेत. ओटीपीसीत हिस्सा असणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये ओएनजीसी, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फंडचाही समावेश आहे. ओएनजीसीचा ओटीपीसीत ५० टक्के हिस्सा आहे. तर इंडियाइन्फ्रास्ट्रक्चर फंड-२चा ओटीपीसीत २३.५ टक्के हिस्सा आहे. ओटीपीसी त्रिपुरा येथे नैसर्गिक वायूवर आधारित ७२६.६ मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प चालवते.

ओटीपीसीचा हिस्सा विकण्याच्या निर्णयावर आयएल अँड एफएसच्या संचालक मंडळाची मंजूरी त्याशिवाय न्यायमूर्ती डी के जैन यांच्या नेतृत्वाखाली देखरेख करणाऱ्या समितीची मंजूरी आणि एनसीएलटीची मंजूरी या व्यवहारासाठी लागणार आहेत. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आयएल अँड एफएसने आर्पवूड कॅपिटल प्रा. लि. आणि जे एम फायनान्शियल लि.ची नियुक्ती केली आहे. 

आयएल अँड एफएस ही पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली असून समूहावर कर्जाचा डोंगर आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी समूहाच्या मालकीच्या विविध मालमत्तांची विक्री करण्याचे धोरण कंपनीने अवलंबले आहे. यातून भांडवलाची उभारणी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

* मालमत्ता विकून भांडवल उभारण्याचा आयएल अँड एफएसचा प्रयत्न
* आयएफआयएन आणि आयईडीसीएल, ओटीपीसीत होल्डिंग कंपन्या 
* आयई़डीसीएलचे १२.०३ टक्के आणि आयएफआयएनचे १३.९७ टक्के शेअर आयएल अँड एफएसकडे
* आयएल अँड एफएस समूहावर कर्जाचा डोंगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT