income tax return  
अर्थविश्व

Income Tax Return: इन्कम टॅक्स भरण्याइतका पगार नाहीये! तरीही भरा कर

३१ मार्चपर्यंत कर भरला नाही तर तुम्हाला दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Income Tax Return: जर तुम्ही आतापर्यंत ITR भरला नसेल तर लवकर भरा. आर्थिक वर्ष २०२१- २२ चा आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत कर भरला नसेल तर लगेच भरा. कारण ३१ मार्चपर्यंत कर भरला नाही तर तुम्हाला दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.

जर व्यक्ती ६० वर्षाची असेल आणि वर्षाला २.५ लाख रूपये कमवत असेल तर त्याला करामधून सूट मिळते. ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न कर सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, त्याला आयकर विवरणपत्र भरावे लागते. ६० वर्षांवरील आणि ८० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत मर्यादा ३ लाख रुपये आहे, तर ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपये आहे. तुमचा पगार आयकर मर्यादेपेक्षा कमी असला तरीही, तुम्ही आयकर रिटर्न भरले पाहिजे. कारण असे करण्याचे अनेक फायदे आहेत.

Income Tax Return Filing

असे आहेत फायदे

१)कर्जासाठी पात्र आहात का ते ठरते- कुठलेही कर्ज घेताना बॅंक आधी तुमची पात्रता तपासते. ही पात्रता उत्पन्नावर आधारित असते. बॅंक तुम्हाला किती कर्ज देईल ते तुमच्या आयकर रिटर्नमध्ये भरलेल्या उत्पन्नावर अवलंबून असते. कारण त्यात तुम्ही तुमची खरी माहिती देत असता. महत्वाचे म्हणजे, , ITR हा एक दस्तऐवज आहे जो सर्व बँका कर्जाच्या सुलभ प्रक्रियेसाठी वापरतात. जर तुम्हाला घर, कार किंवा वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर आयटीआर भरणे आवश्यक आहे कारण यामुळे कर्ज मिळणे सोपे होते.

Income tax

२) कर परताव्यासाठी आवश्यक - जर तुम्ही ITR फाईल केला तर मुद ठेवींसारख्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजावरील कर वाचवता येईल. लाभांश उत्पन्नावरचा करही वाचवता येतो. ITR रीफंडद्वारेही तुम्ही कराचा दावा करू शकता. जर तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही कापलेल्या टीडीएसवर पुन्हा दावा करू शकता.

३) पत्ता, उत्पन्नाचा पूरावा वैध कागदपत्र- आयकर मूल्यांकन आदेश वैध पत्त्याचा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. याचा वापर आधार कार्ड बनवण्यासाठीही होतो. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना फॉर्म-16 दिला जातो. तो त्याच्या उत्पन्नाचा पुरावा असतो. स्वयंरोजगार किंवा फ्री-लांसरसाठी आयटीआर फाइलिंग वैध उत्पन्नाचा पुरावा म्हणून काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT