Mahindra 
अर्थविश्व

महिंद्रा अँड महिंद्राला ३,२५५ कोटींचा तोटा

पीटीआय

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राला मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत ३,२५५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने ९६९.२ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीला ९,००५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीला १३,८०८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. कंपनीच्या महसूलात ३५ टक्क्यांची घट झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२०१९-२० या आर्थिक वर्षात महिंद्रा अँड महिंद्राला ७४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. कंपनीच्या नफ्यात ८६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीला ५,४०१ कोटी रुपयांचा एकूण नफा झाला होता. कंपनीच्या नफ्यातील आणि महसूलातील घट वाहन आणि  ट्रॅक्टर विभागातील विक्रीतील घट, बीएस-६ निकष आणि कोविड-१९ मुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे झाली आहे. 

२०१९-२० या आर्थिक वर्षात महिंद्रा अँड महिंद्राचा महसूल १५ टक्क्यांनी घटून ४४,८६६ कोटी रुपयांवर आला आहे. त्याआधी आर्थिक वर्षात कंपनीला एकूण ५२,८४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा कार्यान्वित नफा २३ टक्क्यांनी घटून ५,४०२ कोटी रुपयांवर आला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीला ७,०११ कोटी रुपयांचा कार्यान्वित नफा मिळाला होता.

ट्रॅक्टरच्या श्रेणीत कंपनीचा बाजारातील हिस्सा १ टक्क्यांनी वाढला असून ३.५ टनांपेक्षा लहान एलसीव्हीमधील हिश्यात १.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ऑटो पीव्हीमधील हिस्सा मात्र ०.८ टक्क्यांनी घटला आहे. 

कोविड-१९चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागणी आणि पुरवठा या दोन्हींवर मोठा परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. यातच भर म्हणून घालावलेले उत्पन्न आणि अनिश्चचितता यामुळे ग्राहकांच्या खर्चावर विपरित परिणाम झाला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT