Best Stocks to Buy Today sakal
अर्थविश्व

महिंद्रा अँड महिंद्राचे (M&M) शेअर्स करणार मालामाल; 72 टक्के वाढीचा तज्ञांचा अंदाज

पुढील दोन वर्षांत महिंद्रा अँड महिंद्राचे (M&M) शेअर्स 70 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतात, असा अंदाज शेअर मार्केट तज्ञांनी वर्तवला आहे.

शिल्पा गुजर

Best Stock to Buy: शेअर बाजारात सध्या चांगलीच अस्थिरता दिसून येत आहे. यात, जर तुम्हाला लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून दर्जेदार स्टॉक घ्यायचे असतील, तर तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) शेअर्सचा विचार करू शकता. ब्रोकरेज रिसर्च फर्म IDBI कॅपिटलने महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) शेअर्सच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. पुढील दोन वर्षांत या स्टॉकमध्ये 70 टक्क्यांहून अधिक परतावा अपेक्षित आहे.

ब्रोकरेज हाऊसचे मत?

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) मॅनेजमेंटचा फोकस वाढीसह व्हॅल्यू क्रिएशनवर असल्याचे IDBI कॅपिटलचे म्हणणे आहे. कंपनीच्या वाहन व्यवसायात मजबूत रिकव्हरी अपेक्षित आहे. FY22-24E मध्ये 31 टक्के PAT CAGR अपेक्षित आहे. त्याच वेळी, कंपनीला इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि इतर व्यवसायांमध्ये व्हॅल्यू अनलॉकिंगची आशा आहे. (Latest News Update of Share Market)

आयडीबीआय कॅपिटलने महिंद्रा अँड महिंद्राच्या (M&M) स्टॉकला 'बाय' रेटिंग दिले आहे. तसेच, प्रति शेअर टारगेट 1,616 रुपये ठेवण्यात आले आहे. 26 एप्रिल 2022 रोजी शेअरची किंमत 940 रुपयांवर बंद झाली. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 72 टक्के परतावा मिळू शकतो.

कंपनीची ट्रॅक्टर व्यवसायात स्थिर वाढ होत आहे. व्हॉल्यूमच्या बाबतीत, ते जगातील सर्वात मोठे ट्रॅक्टर उत्पादक म्हणून कायम राहील. भारतात, महिंद्रा, स्वराज आणि ट्रॅकस्टार या तीन ब्रँड अंतर्गत ट्रॅक्टर विकते. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा सुमारे 40 टक्के आहे.पुढील 2 वर्षात कंपनीची व्हॉल्यूम वाढ सुमारे 8 टक्के असू शकते. कंपनीला सामान्य मान्सून, कृषी आणि ग्रामीण खर्च, जागतिक कृषी गुंतवणूक आणि कृषी यंत्रसामग्री विभागातील वाढीचा फायदा होईल.

इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EV) सेगमेंटबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीकडे उत्पादनाची मजबूत लाइन आहे. भारतीय बाजारपेठेत ईव्ही आणणारी ही आघाडीची कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्राने (M&M) बेंगळुरू-आधारित स्टार्टअप रेवा इलेक्ट्रिक कार कंपनीच्या अधिग्रहणाद्वारे आपल्या EV पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. M&M कडे सध्या व्हेरिटो हे EV मॉडेल आहे. पुढील 12-18 महिन्यांत, स्ट्रॅटजिक पार्टनरशिप किंवा गुंतवणूकदारांद्वारे ईव्ही व्यवसायात ताकद दाखवू शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातल्या आणखी चौघांना अटक, हत्येनंतर गुजरातला झालेले फरार

Latest Marathi News Updates: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

Besan Cheela Vs Oats Cheela: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात बेसन चीला की ओट्स चीला फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

Sinhagad Road : माणिकबाग परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT