mukesh ambani
mukesh ambani 
अर्थविश्व

मुकेश अंबानी बनले जगातले पाचवे सर्वात श्रीमंत; इतकी आहे संपत्ती

सूरज यादव

मुंबई - गुंतवणुकीचा वर्षाव आणि नवनव्या डिजिटल उपक्रमांमुळे चर्चेत आलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज दोन हजार रुपयांची उच्चांकी पातळी ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला. दरम्यान, कंपनीचे बाजार भांडवलीमूल्य वाढल्याने कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आता जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 

गेले काही दिवस, विशेषतः वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरभावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज या शेअरभावाने 2010 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आणि मुंबई शेअर बाजार बंद होतेवेळी हा शेअर 2004 रुपयांवर स्थिरावला. आदल्या दिवशीच्या तुलनेत त्यात 32.45 रुपयांची वाढ झाली. 

मार्चमध्ये शेअर बाजार जेव्हा मोठ्या प्रमाणात कोसळला होता, त्यावेळी या शेअरचा भाव 867.43 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला होता. तेव्हापासून अवघ्या चार महिन्यांत त्यात तब्बल 130 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली. सध्याच्या काळात लॉकडाउन असूनही या शेअरने आपली घोडदौड कायम ठेवली आहे. 

विक्रमी बाजार भांडवलीमूल्य
या कंपनीने बाजार भांडवलीमूल्याचा विक्रमही प्रस्थापित केला आहे. 12 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलीमूल्याचा टप्पा या कंपनीने आता ओलांडला आहे. आज तिचे बाजार भांडवलीमूल्य 12.62 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. असा टप्पा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. 

जगातील "टॉप'च्या पाच श्रीमंत व्यक्ती 
1) जेफ बेझॉस (ऍमेझॉनचे संस्थापक-सीईओ)  -  185.8 अब्ज डॉलर 
2) बिल गेट्‌स (मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक) - 113.1 अब्ज डॉलर 
3) बर्नार्ड आर्नो (लुई वित्तोंचे अध्यक्ष) - 112 अब्ज डॉलर 
4) मार्क झुकरबर्ग (फेसबुकचा सहसंस्थापक-सीईओ) - 89 अब्ज डॉलर 
5) मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष) - 75 अब्ज डॉलर 

मुकेश अंबानींची आगेकूच 
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आता जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. "फोर्ब्स'च्या यादीनुसार, अंबानी यांनी सहाव्या स्थानावरून आगेकूच करीत आता पहिल्या पाचांत स्थान मिळविले आहे. त्यांनी आता जगप्रसिद्ध गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांना मागे टाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, अंबानी यांची संपत्ती बुधवारी 3.2 अब्ज डॉलरने वाढली आणि ती एकूण 75 अब्ज डॉलर (सुमारे 5.61 लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT