Mukesh Ambani  Sakal
अर्थविश्व

Mukesh Ambani : मुकेश अंबानींची मोठी डील; कापड क्षेत्रातील 'ही' कंपनी घेतली विकत, गुंतवणूकदारांना...

मुकेश अंबानी यांनी आणखी एक मोठी कंपनी विकत घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mukesh Ambani Latest News : मुकेश अंबानी यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी कर्जबाजारी असणाऱ्या कापड क्षेत्रातील कंपनीचे नशीब बदलणार आहेत. याबाबत एनसीएलटीकडून मंजुरी मिळाली आहे.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझच्या संयुक्त बोलीला मंजुरी दिली आहे. एनसीएलटीच्या या निर्णयाचा कंपनीच्या गुंतवणूकदारांनाही मोठा फायदा होणार आहे.

शेअर बाजाराला माहिती देताना, सिंटेक्स इंडस्ट्रीजने सांगितले की, NCLT खंडपीठाने आदेश दिले आहेत की, रिलायन्स आणि ACRE ने सादर केलेल्या कर्ज निराकरण योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

सध्या सिंटेक्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. रिलायन्स-एसीआरई योजनेमध्ये शेअर भांडवलात कपात आणि शून्य मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे डिलिस्टिंग समाविष्ट आहे.

रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स आणि ACRE यांनी संयुक्तपणे सुमारे 3650 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता. त्याच वेळी, सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या कर्जदारांनी संयुक्त बोलीच्या बाजूने मतदान केले.

दुसरीकडे, गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कंपनीच्या समस्या सोडवण्यासाठी एनसीएलटीची मदत घेण्यात आली होती.

कंपनीचे कर्ज किती आहे?

सिंटेक्स इंडस्ट्रीज विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया एप्रिल 2022 मध्ये सुरू झाली. सध्या कंपनीवर 7500 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. बोली लावणाऱ्यांमध्ये वेलस्पन समूहाची फर्म इझीगो टेक्सटाइल्स, जीएचसीएल आणि हिमसिंगका व्हेंचर्स यांचा समावेश होता.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर शेअर्स :

सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कंपनीचा शेअर 2.30 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. या वर्षी कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे.

त्याच वेळी, या स्टॉकची 52 आठवड्यांची विक्रमी पातळी 11.45 रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्समध्ये 69.13 टक्क्यांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT