Multibaggers Team eSakal
अर्थविश्व

Multibagger Stock : हा शेअर घसरत असल्याने स्टॉक विकण्याचा शेअर मार्केट तज्ज्ञांचा सल्ला...

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने विनती ऑरगॅनिक्सवर 1690 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

 multibagger stock : केमिकल सेक्टरमधील कंपनी विनती ऑरगॅनिक्सच्या (Vinati Organics) शेअर्सने अवघ्या 20 वर्षांत केवळ 6100 रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. पण आता त्याचे शेअर्स घसरत असल्याचे दिसून येत असून बाजारातील तज्ज्ञ ते विकण्याचा सल्ला देत आहेत.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने विनती ऑरगॅनिक्सवर 1690 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. सध्या हे शेअर्स 1940 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

विनती ऑरगॅनिक्सने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अंदाजांना मागे टाकत एडजस्टेड नेट प्रॉफिट 10 टक्के वाढ नोंदवली. अपेक्षेपेक्षा कमी कच्च्या मालाचा खर्च आणि कमी ऑपरेटिंग खर्चामुळे त्याचा निव्वळ नफा वाढला.

पण, त्याचा रेव्हेन्यू मिक्स एटीबीएसवरून ब्यूटाइल बेंझिन, ब्यूटाइल फेनॉल आणि इतर उत्पादनांकडे वळला ज्यात कमी मार्जिन आहे. तर एटीबीएस अर्थात एक्रिलेमाइड टर्शियरी-ब्यूटिल सल्फोनिक ऍसिडचे (acrylamide tertiary-butyl sulfonic acid) मार्जिन जास्त आहे. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की कंपनीचे सध्याचे व्हॅल्यूएशन जास्त आहे. त्यामुळे ब्रोकरेजने 1690 रुपयांचे टारगेट निश्चित करत विक्रीचे रेटिंग दिले आहे.

विनती ऑरगॅनिक्सचे शेअर 14 फेब्रुवारी 2003 रोजी अवघ्या 1.17 रुपयांना होते. आता याचे शेअर्स 1658 पटीने वाढत 1940 रुपयांवर गेले आहेत. म्हणजे त्या वेळी फक्त 6100 रुपयांची गुंतवणूकीचे आज एक कोटी झाले असते. गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी 2022 रोजी त्याची किंमत 1675 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे.

त्यानंतर 12 सप्टेंबर 2022 रोजी तो सात महिन्यांत 42 टक्क्यांनी वाढून 2372.95 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. पण त्यानंतर घसरण होत याची किंमत 18 टक्क्यांनी कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते त्यात आणखी 13 टक्क्यांनी घट होईल. त्यामुळे हे शेअर्स विकण्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Mohol News : शेततळ्यात पाय घसरून पडून विवाहितेचा मृत्यू

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड, प्रत्येक घडामोडीवर करडी नजर; 'असा' असेल प्लॅन

Maratha Reservation : मुंबई आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून तिघांची सायकलवारी

SCROLL FOR NEXT