Nestle India Dividend sakal
अर्थविश्व

Nestle India Dividend: नेस्लेकडून 120 रुपयांचा अंतरिम डिव्हिडेंड जाहीर

डिव्हिडेंडच्या शिफारशीच्या बातमीनंतर नेस्ले इंडियाचे शेअर्स बीएसईवर इंट्राडेमध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह 19,848 रुपयांवर पोहोचले.

सकाळ डिजिटल टीम

share Market: नेस्ले इंडियाच्या बोर्डाने 2022 साठी प्रति शेअर 120 रुपयांच्या दुसऱ्या अंतरिम डिव्हिडेंडची शिफारस केल्याचे सांगितले आहे. सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना त्यांनी याबाबत घोषणा केली. याआधी 6 मे 2022 रोजी 25 रुपयांचा पहिला डिव्हिडेंड देण्यात आला होता. (Nestle have declared second interim dividend for 2022 of Rs 120 per equity share)

डिव्हिडेंडच्या शिफारशीच्या बातमीनंतर नेस्ले इंडियाचे शेअर्स बीएसईवर इंट्राडेमध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह 19,848 रुपयांवर पोहोचले. नेस्ले इंडियाच्या स्टॉकने गेल्या 5 महिन्यांत 24 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, सहा महिन्यांत 10 टक्के आणि वर्षभरात 2 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत 2022 सालासाठी प्रति शेअर 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूने 120 रुपयांचा दुसरा डिव्हिडेंड जाहीर केल्याचे नेस्ले इंडियाने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल ?

नेस्ले इंडियाच्या सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसले. कंपनीने 8.3 टक्क्यांच्या वाढीसह 668 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. दुसरीकडे, नेस्ले इंडियाचा महसूल वार्षिक 18.3 टक्क्यांनी वाढून 4,591 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, कंपनीची विक्री 18.2 टक्क्यांनी वाढून 4,567 कोटी रुपये झाली, जी गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च आहे.

रेकॉर्ड डेट

2022 वर्षासाठी दुसरा अंतरिम डिव्हिडेंड 16 नोव्हेंबर 2022 पासून दिला जाईल. याची रेकॉर्ड तारीख 1 नोव्हेंबर 2022 अशी निश्चित करण्यात आली आहे, म्हणजे या तारखेपर्यंत ज्या शेअरहोल्डर्सची नावे कंपनीचे सदस्य म्हणून किंवा डिपॉझिटरीजमध्ये बेनीफिशियल ओनर्स म्हणून नोंदणीकृत आहेत, त्यांना डिव्हिडेंड दिला जाईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT