share and stock market Sakal
अर्थविश्व

सहा ते नऊ महिन्यात बक्कळ कमाईची संधी; 'या' शेअरवर ठेवा नजर

शेअर मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे टाकून काही वर्षातच ते दुप्पट तिप्पट करू शकता.

सुमित बागुल

शेअर मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे टाकून काही वर्षातच ते दुप्पट तिप्पट करू शकता. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही योग्य स्टॉक निवडले पाहिजेत. शेअर्स निवडताना अडचण येत असेल तर तज्ज्ञांची मते जाणून घेणे आवश्यक आहे आणि तज्ज्ञ काय सांगतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच आलो आहोत. काही तज्ज्ञ मंडळी कायमच त्यांचे आवडते स्टॉक कोणते याबाबत माहिती देत असतात. हे एक्सपर्ट्स नेमके कोणती माहिती देतात त्यावरून तुम्हाला चांगले कमाई देणारे स्टॉक निवडणे सोपे जाईल. जर तुम्ही स्टॉकवर पैसे लावण्याचा विचार करत असाल, तर मार्केट एक्स्पर्ट संदीप जैन तुमच्यासाठी बंपर कमाई करणारे शेअर्स घेऊन आलेत. त्यांनी GEMS सेगमेंटमध्ये TCPL Packaging शेअर खरेदी करायचा सल्ला दिला आहे. या कंपनीविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (next six to nine months can be earn more Keep an eye on this stock sb01)

TCPL Packaging चे शेअर्स का घेतले पाहिजे ?

मार्केट एक्स्पर्ट संदिप जैन यांनी या कंपनीला क्वालिटी कंपनी असे संबोधले आहे. देशातील सगळ्यात मोठ्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यामध्ये हिचा नंबर लागतो. या कंपनीत जवळपास 1,600 कामगार काम करतात. ही कंपनी फार्मा, टेक्सटाइल, स्टील आणि केमिकलमध्ये बिझनेस करते. पॅकेजिंग सेक्टरमधील ही स्टँडअलोन कंपनी असल्याचे संदीप जैन सांगतात. ही देशातील एकमेव पॅकेजिंग कंपनी आहे, जी चार ऑफसेट प्लॅन चार वेगवेगळ्या लोकेशनवर चालवते.

TCPL Packaging वरील खरेदी

Target - 650

Duration - 6-9 महिने

कंपनीच्या फंडामेंटलविषयी माहिती

मागच्या तीन वर्षात कंपनी चांगले प्रॉफिट (Profit) देत आहे, सोबतच सेल सुद्धा 11 टक्के ग्रोथ (Sale Growth) ने वाढत असल्याचे मार्केट एक्स्पर्ट संदीप जैन यांनी सांगितलं. शिवाय डिव्हीडंड यील्ड (dividend Yield) 1.15 टक्क्यांच्या आसपास आहे. कंपनीत DIIs चा स्टेक 5.5 टक्क्यांच्या आसपास आहे. तर पब्लिक शेअर होल्डिंगची भागीदारीही 12.13 टक्के इतकी आहे.

संदिप जैन यांच्या GEMS सेगमेंटला नुकतेच वर्ष झाले. या संपूर्ण एका वर्षात संदिप जैन यांनी एकही स्टॉक रिपीट केलेला नाही. या काळात त्यांनी 250 स्टॉकच्या खरेदीचा सल्ला दिला आहे आणि प्रत्येक शेअरबाबत गंभीर विचार आणि संशोधनानंतरच त्यांनी या शेअर्सबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT