PAN-Aadhaar 
अर्थविश्व

पॅन-आधार जोडा मार्चपर्यंत; सलग आठवी मुदतवाढ!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅन आणि आधार क्रमांकाच्या जोडणीची मुदत आणखी वाढविली आहे. आता पॅन कार्ड धारकांनी आधारशी जोडणी करून घेण्यासंदर्भातील मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याआधी सीबीडीटीने पॅन-आधार जोडणी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2019 पर्यंत जाहीर केली होती. 

1961 मधील तरतूद 139AA नुसार,  पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे. पॅन आणि आधार क्रमांकाच्या जोडणीची मुदत आता 31 मार्च 2020 करण्यात आल्याची माहिती सीबीडीटीने अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. 

सलग आठव्यांदा मुदत वाढ 

केंद्र सरकारने सलग आठव्यांदा जोडणीची मुदत वाढवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निर्णय दिला होता की आधार हे आता प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळण्यासाठी बंधनकारक असेल.  

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड दिले जाते, तर प्राप्तिकर विभागाकडून पॅन कार्ड देण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT