Petrol Diesel Prices esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

21 मे रोजी सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात झाली. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनीही आपला व्हॅट कमी करत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे 8 रुपये आणि डिझेलचे दर 6 रुपये कमी झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज 16 व्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

दिल्ली - 96.72 रुपये प्रति लीटर

मुंबई - 111.35 रुपये प्रति लीटर

चेन्नई - 102.63 रुपये प्रति लीटर

कोलकाता - 106.03 रुपये प्रति लीटर

देशातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

दिल्ली - 89.62 रुपये प्रति लीटर

मुंबई - 97.28 रुपये प्रति लीटर

चेन्नई - 94.24 रुपये प्रति लीटर

कोलकाता - 92.76 रुपये प्रति लीटर

आज राज्यात देखील पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर अनुक्रमे 111.35 आणि 97.28 रुपये एवढा आहे तर पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111. 30 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98 रुपये इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 111.02 रुपये असून डिझेलचा भाव 95.54 रुपये एवढा आहे तर नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये एवढा आहे तर डिझेलचा भाव प्रति लिटर 95.73 रुपये एवढा आहे. नागपूरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 111.41 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलचा दर 95.92 रुपये आहे

वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटर होती, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर विकले जात होते. तेव्हापासून आतापर्यंत अनेकवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडू लागल्या. 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 10 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र केंद्र सरकारच्या पुढाकाराने 21 मे रोजी पुन्हा एकदा लोकांना दिलासा मिळाला.

घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT