शेअर बाजारात सध्या अतिशय अस्थिर वातावरण आहे. चलनवाढ आणि सेंट्रल बँकांच्या कठोर धोरणांमुळे 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी खूप अस्थिर होते. असे असतानाही अनेक शेअर्सनी चांगला परतावा दिला आहे.
होय, आम्ही या वर्षातील सर्वात मोठ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल बोलत आहोत, ज्याने 2022 मध्ये जवळपास 2,200 टक्के परतावा दिला आहे. हेमांग रिसोर्सेस लिमिटेड (Hemang Resources ltd) असे या कंपनीचे नाव आहे. ही एक कोळसा पुरवठा करणारी कंपनी आहे. फक्त या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 20 पटीहून अधिक वाढलेत. (Powerful Share of year 2022 give best return)
2022 च्या सुरुवातीला हा शेअर केवळ 3 रुपये होता, ज्याची किंमत आज 70 रुपये झाली आहे. ही कंपनी कोळसा व्यापार आणि पायाभूत सुविधांच्या व्यवसायात आहे. कंपनी आयात केलेला आणि स्वदेशी कोळसा विकते. कंपनी देशात व्यापार करते आणि स्टीव्हडोरिंग आणि लॉजिस्टिक सेवाही देते.
हा एक पेनी स्टॉक आहे आणि गुंतवणूकदार पेनी स्टॉक्सबाबत धोका पत्करायला तयार नसतात. पण हेमांग रिसोर्सेसने हा समज धुडकावून लावत दमदार कामगिरी केली आहे. सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत, कंपनीचा महसूल 155.53 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 19.52 कोटी रुपये होता.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच तिमाहीत तिचा महसूल शून्य होता आणि कंपनीला 5 लाख रुपयांचा तोटा झाला होता. पण आर्थिक वर्ष 2023 मध्ये चित्र पुर्णतः पालटले. शिवाय येत्या काळात कोळशाची मागणी आणि किमती वाढतील असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.