Share Market Sakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स ते 5.9 टक्के वाढ करण्याची घोषणा केली.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरण जाहीर केल्यानंतर शुक्रवारी बाजारात तेजी दिसून आली. आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स ते 5.9 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. आरबीआयचे धोरण जाहीर झाल्यानंतर, तांत्रिकदृष्ट्या मोठ्या विक्रीनंतर, निफ्टीने 16800 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि बाऊंसबॅक केल्याचे कोटक सिक्युरीटीजचे अमोल आठवले म्हणाले. निर्देशांकाने डेली चार्टवर एक लाँग बुलिश कॅडल तयार केली. त्याने विकली चार्टवर हॅमर कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे जे सकारात्मक संकेत आहेत. (Pre Analysis of Share Market update 3 october 2022 )

200-दिवसांचे एसएमए (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) आणि 16900 वर ट्रेंड-फॉलोइंग ट्रेडर्ससाठी सपोर्ट लेव्हल म्हणून काम करतील. यावर गेल्यास 17250 पर्यंत तेजी राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत इंडेक्स 17400 पर्यंत चढू शकतो. दुसरीकडे, 16900 च्या खाली गेल्याने अपट्रेंड कमकुवत होईल. तो घसरला तर इंडेक्स 16800 - 16700  वर घसरू शकतो.

शुक्रवारी निफ्टी हिरव्या चिन्हावर गेल्याचे मोतीलाल ओसवालचे सिद्धार्थ खेमका म्हणाले. त्यानंतर यात चांगली तेजी दिसली. विशेषतः बँकिंग क्षेत्रातील सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. शुक्रवारी बाजाराला काहीसे बळ मिळाले. सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाली. निर्देशांक जवळपास 300 अंकांच्या वाढीसह बंद झाला. त्याने 17,000 चा झोन परत मिळवला. यामुळे शॉर्ट टर्ममध्ये टेक्निकल व्ह्यू पॉझिटिव्ह झाला.

निफ्टी आता 17,500-17,700 झोनच्या दिशेने 17,000 आणि 16850 च्या आसपास मजबूत सपोर्टसह जाऊ शकतो असे सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले. देशात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान मासिक विक्री डेटा आणि उच्च मागणीमुळे ऑटो आणि कंझम्प्शन सेक्टर्सवर फोकस असेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
आयडीएफसी फर्स्ट बँक ()
ज्युबिलंट फुडवर्क्स लिमिटेड (JUBLFOOD)
डिक्सन (DIXON)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
ऍस्ट्रल (ASTRAL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT