RBI  sakal media
अर्थविश्व

आरबीआयचा महाराष्ट्रातील बँकेला दणका; काढता येणार केवळ 15 हजार

ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : RBI ने मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर (Raigad Cooperative Bank) निर्बंध लागू केले असून, या निर्बंधामुळे ठेवीदारांना खात्यातून केवळ 15 हजार रुपयेच काढता येणार आहेत. बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतला आहे. लादण्यात आलेले हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असतील असे आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. (Raigad Cooperative Bank News In Marathi )

निर्बंध लागू करण्यात येत असल्याने बँकेतील बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीधारांना खात्यातून केवळ 15 हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यापेक्षा अधिकची रक्कम ठेवीदारांना काढण्यावर निर्बंध असतील असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेवर फक्त निर्बंध लावण्यात आले असून त्यांचा बँकिंग परवाना रद्द केलेला नसल्याचेही आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. तसेच जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत संबधित बँक निर्बंधांसह दैनंदिन कामकाज करू शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT