PMC-Bank 
अर्थविश्व

पीएमसी बँक : 'पीएमसी'च्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांसाठी सोमवारी (ता.30) रिजर्व्ह बँकेने टोल फ्री क्रमांक सुरू केला.

ग्राहकांना त्यांच्या तक्रारी 1800223993 या क्रमांकावर नोंदवता येतील. त्याचबरोबर www.pmcbank.com या संकेतस्थळावर ग्राहक तक्रार करू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे. त्याशिवाय पीएमसी बँकेचे संचालक मंडळ रिजर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे.

आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (ता.24 सप्टेंबर) पासून सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले. रिझर्व्ह बँकेने बँकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतल्यामुळे यापुढे बँकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारणे अशा कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नाही. तसेच या बँकेच्या खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पीएमसी बँकेला आरबीआयच्या कलम 35-ए अंतर्गत नियमक बंधनात आल्याने सर्व खाते धारकांचे आर्थिक व्यवहार 24 सप्टेंबरपासून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त एक हजार रुपये दर महिन्यास काढ़ता येणार आहेत.

तसेच ग्राहकांना आता बँकेकडून कर्जदेखील मिळणार नाही. त्यामुळे या बँकमध्ये खाते असणारे नागरिक घाबरले आहेत. बँकेची सेवा पूर्ववत होण्याकरिता किमान सहा महिने इतका कालावधी लागणार आहे, अशी माहिती बँकेचे अधिकारी देत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT