post office esakal
अर्थविश्व

पोस्ट ऑफिसची RD Scheme! कोणत्याही जोखीमशिवाय स्मार्ट गुंतवणूक

पोस्ट ऑफिसची आरडी डिपॉझिट खाते ही एक चांगली योजना आहे

शिल्पा गुजर

पोस्ट ऑफिसची आरडी डिपॉझिट खाते ही एक चांगली योजना आहे

Post office scheme : पोस्ट ऑफिस स्कीममध्ये (Post office scheme) सहसा कोणताही धोका नसतो. तुम्हालाही कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक (Investment)सुरू करायची असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण पोस्ट ऑफिसने तुमच्यासाठी एक चांगली योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेंतर्गत, कमी गुंतवणूक करूनही तुम्ही अवघ्या 10 वर्षात 16 लाख रुपयांचे मालक होऊ शकता. होय, आम्ही RD स्कीमबद्दल बोलत आहोत.

पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते (RD deposit account)ही सरकारची योजना आहे. या स्कीममध्ये तुम्ही अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. एवढेच नाही तर या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त रक्कम, तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. यात पाच वर्षांसाठी खाते उघडता येते. दुसरीकडे, बँका सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी आवर्ती ठेव खाती ऑफर करतात. प्रत्येक तिमाहीत, त्यात जमा केलेल्या पैशावर व्याज (वार्षिक दराने) मोजले जाते.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त रिटर्न मिळतात. सध्या, आवर्ती ठेवीवर 5.8 टक्के व्याजदर दिला जात आहे, जो 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत त्यांच्या सर्व लहान बचत कार्यक्रमांसाठी व्याज दर (Interest rate)सेट करते. तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये दहा वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 5.8 टक्के दराने 16 लाख रुपये मिळतील. 10 हजार हा आकडा उदाहरणासाठी दिला आहे, तुम्ही या स्कीममध्ये हवी तेवढी रक्कम गुंतवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; तहसीलदारांचा जामीन फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?

Viral Video: धावत्या रिक्षात कपलचा सुरु होता रोमान्स, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा

Latest Marathi News Live Update : जमिनीचा बेकायदा ताबा घेत खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला अटक

SCROLL FOR NEXT