SBI esakal
अर्थविश्व

सावधान! फसवणुकीबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना इशारा

ग्राहकांनी सावध राहावे, असे एसबीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शिल्पा गुजर

ग्राहकांनी सावध राहावे, असे एसबीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना फसवणुकीबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत ग्राहकांना सावध केले आहे. बँक तपशील, एटीएम किंवा यूपीआय पिन कोणाशीही शेअर करू नका. खरं तर, भेटवस्तू (Gift) प्रकरणातील बनावट लिंकवर क्लिक करून अनेक वेळा लोक फसवणुकीचे बळी ठरतात. त्यामुळे ग्राहकांनी सावध राहावे, असे एसबीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- बँक अशी कोणतीही माहिती विचारत नाही

बँक किंवा त्यांचे कर्मचारी तुम्हाला खाते क्रमांक, डेबिट कार्ड तपशील आणि इंटरनेट बँकिंग संबंधित माहिती यासारखी कोणतीही माहिती विचारत नाहीत असे एसबीआयने म्हटले आहे. त्याच वेळी, बँक OTP मागत नाही किंवा फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करण्यास सांगत नाही. काही सायबर ठग ग्राहकांना एसबीआयच्या नावाने मेसेज करून माहिती विचारत आहेत. त्यामुळे एसबीआयच्या नावाने कोणत्याही व्यक्ती किंवा थर्ड पार्टीच्या माध्यमातून अशी माहिती मागवण्यात आलेले मेसेज आले तर सावध व्हा, असा इशारा बँकेकडून देण्यात आला आहे.

तुम्ही इथे तक्रार करू शकता

सायबर यांनी पाठवलेले हे मेसेज ट्रॅक करणे अवघड नाही, कारण या मेसेजमध्ये स्पेलिंगची चूक असतेच. याशिवाय ग्राहक सायबर क्राईमच्या https://cybercrime.gov.in या वेबसाइटवर तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. त्याच वेळी हेल्पलाइन क्रमांक 155260 वर देखील याबद्दल माहिती देऊ शकतात. दुसरीकडे, SBI च्या ग्राहकाच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार (unauthorized transaction) होत असल्यास, ग्राहक सेवा क्रमांक (Customer care number) 1800111109 वर कॉल करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT