Pharma Shares sakal
अर्थविश्व

Share Market : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' फार्मा कंपनीत गुंतवणूक करण्याचा तज्ञांचा सल्ला

कंपनीचे शेअर्स 30 जानेवारी 2009 रोजी फक्त 2.81 रुपयांना होते. यानंतर आता तो वाढून 890 रुपयांवर गेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : देशांतर्गत बाजारात सध्या खूप चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशत पॉली मेडीक्योरच्या (Poly Medicure) शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. सोमवारी 2.29 टक्क्यांच्या वाढीसह 890 रुपयांवर बंद झाला. बाजार तज्ज्ञांच्या मते, त्याची वाढ आणखी 11 टक्क्यांनी वाढू शकते.

पॉली मेडीक्योरचे शेअर्स 30 जानेवारी 2009 रोजी फक्त 2.81 रुपयांना होते. यानंतर आता तो 31573 टक्क्यांनी वाढून 890 रुपयांवर गेला आहे.

म्हणजे त्यावेळी केवळ 32 हजार रुपयांची गुंतवणूक केवळ 14 वर्षांत 317 पटीने वाढून 1.01 कोटी रुपये झाली असती. पॉली मेडीक्योरने केवळ लाँग नाही तर शॉर्ट टर्ममध्येही उत्कृष्ट परतावा दिला आहे.

गेल्या वर्षी 26 मे 2022 रोजी त्याच्या शेअर्सची किंमत 652.30 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्सची खरेदी वाढली आणि अवघ्या 6 महिन्यांत ती 60 टक्क्यांनी वाढून 1044.40 रुपयांवर पोहोचली.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

पण, विक्रीच्या दबावामुळे ते आतापर्यंत 15 टक्क्यांनी घसरले आहे. पण एका वर्षाच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर त्यात झालेली घसरण ही गुंतवणुकीची मोठी संधी म्हणून पाहिली पाहिजे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने त्याचे रेटिंग होल्ड वरून अपग्रेड केले आहे, शिवाय 991 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

पॉली मेडीक्योरसाठी डिसेंबर 2022 ची तिमाही त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगली होती असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे.

सर्व विभागांमध्ये मजबूत मागणीमुळे, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये 23.7 टक्क्यांनी वाढून 280 कोटी रुपये झाला. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 44.9 टक्क्यांनी वाढून 50 कोटी डॉलरवर पोहोचला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Schools Closed India : देशात ५ वर्षांत १७ हजार सरकारी शाळा बंद, अहवालातून धक्कादायक माहिती उघड; शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

'श्री' पुन्हा परतला! शंशाक केतकरचं झी मराठीवर कमबॅक, 'या' मालिकेत एन्ट्री घेणार

Pimpri Chinchwad Metro: निगडी-चाकण मेट्रो मार्ग ‘डीपीआर’च्या टप्प्यात; सुमारे १३ हजार कोटींचा आराखडा, शहरात ‘रिंग मेट्रो नेटवर्क’चीही चर्चा

Latest Live Updates Marathi : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरली; अनेक जण जखमी

PoK Election Violence : पीओके विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार; गोळीबाराचा थरारक व्हिडिओसमोर, ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT