Share Market esakal
अर्थविश्व

Share Market : 18 हजार रुपयांचे बनले 1 कोटी, तुम्हाला माहितेय का हा स्टॉक ?

अजंताचे शेअर्स गेल्या 24 वर्षांत 550 पटीने वाढले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : अजंता सोया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहे. अजंताचे शेअर्स गेल्या 24 वर्षांत 550 पटीने वाढले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदार 20 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर कोट्यधीश झाले आहेत. 30 सप्टेंबरला बीएसईवर त्याचे शेअर्स 44.55 रुपयांवर बंद झाले. त्याची मार्केट कॅप 358.55 कोटी रुपये आहे.

अजिंठा सोयाचा एक शेअर 19 नोव्हेंबर 1998 साली केवळ 8 पैशांवर होता, तो आता आता 557 पटीने वाढून 44.55 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराने त्यावेळेस त्यात फक्त 18 हजार रुपये गुंतवले असते, तर आतापर्यंत त्याचे 1 कोटीपेक्षा जास्त झाले असते. गेल्या एका वर्षात अजंता सोयाच्या शेअर्सने 75 टक्के आणि पाच वर्षांत 336 टक्के परतावा दिला आहे. 29 एप्रिल 2022 रोजी त्याच्या किमती 69.38 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर होत्या.

अजंता सोया वेगवेगळ्या प्रकारचे कुकिंग ऑईल तयार करते. ही कंपनी बेकरीसाठी प्रोडक्ट्सही तयार करते. त्यांचे प्रोडक्ट्स ध्रुव, आंचल आणि पर्व या ब्रँड नावाने विकली जातात. चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही कंपनीसाठी चांगली राहिली. तिचा नेट प्रॉफिट एप्रिल-जून 2022 मध्ये तिमाही आधारावर 90.8 लाख रुपयांवरून 1.09 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, त्याची कमाईही 32.94 कोटी रुपयांवरून 36.10 कोटी रुपये झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT