Share Market Latest News Updates sakal
अर्थविश्व

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात घसरणीचे सत्र मागील आठवड्यापासून सुरु आहे

सकाळ डिजिटल टीम

आज सकाळपासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत होती. शेअर बाजारात आज सेन्सेक्स 105 अंकानी घसरत 54364 वर बंद झाला तर निफ्टी 61 अंकानी घसरुन 16,240 वर बंद झाली. शेअर बाजारात घसरणीचे सत्र मागील आठवड्यापासून सुरु आहे. (share market closing update 10th may 2022)

शेअर बाजारात अस्थिरता, सेन्सेक्स वधारला तर निफ्टीत घसरणआठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. शेअर बाजाराने प्री-ओपनिंगमध्ये नफ्यावर सुरुवात केली आहे. सेन्सेक्स 107.98 अंकांच्या वाढीसह तो 54,600 वर सुरु झाला आहे तर निफ्टी २९.५० अंकांनी टक्क्यांनी घसरत 16300 वर सुरु झाला.

भारतीय बाजारात सोमवारची सुरुवात कमजोर झाली आणि दिवसभर ही कमजोरी अशीच राहली. मोठ्या प्रमाणात विक्री, डॉलरची मजबूती, महागाई वाढण्याची भीती आणि मध्यवर्ती बँकांनी कठोर आर्थिक धोरण स्वीकारण्याची शक्यता यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला होता. शेवटी सेन्सेक्स 364.91 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 54,470.67 वर बंद झाला होता दुसरीकडे, निफ्टी 109.40 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 16,301.85 वर बंद झाला होता.

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात सहा संचालकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT