Share Market News Updates
Share Market News Updates esakal
अर्थविश्व

सलग दुसऱ्याही दिवशी शेअर बाजार कोसळला, Sensex 590 अंकानी घसरला

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या दुसऱ्याही दिवशी शेअर बाजारात सुरवातीच्या सत्रापासून घसरण दिसून आली. प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण होत शेअर बाजारची आज सुरवात झाली. ही घसरण शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती. अखेर घसरणीसह शेअर बाजार बंद झाला.

आज सेन्सेक्स 590 अंकानी घसरुन 55.082 वर बंद झाला तर निफ्टीतही 164 अंकाची घसरण होत 16.400 वर बंद झाला.

आशियाई बाजारातून येणारे संमिश्र संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि कोविड प्रकरणांमध्ये झालेली वाढ यामुळेही सोमवारीही दबाव दिसून आला होता. शेवटी सेन्सेक्स 93.91 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 55,675.32 वर बंद झाला होता तर दुसरीकडे, निफ्टी 14.75 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 16,569.55 वर बंद झाला होता.

महागाई वाढण्याची आणि व्याजदरात वाढ होण्याची भीती याचा बाजारावर दबाव असल्याचे झाल्याचे कोटक सिक्युरिटीचे श्रीकांत चौहान म्हणाले. या आठवड्यात सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवलेत, ज्याचा परिणाम बाजारावर होत असल्याचेही ते म्हणाले.

बाजारात सध्या वाढती महागाई, व्याजदरातील वाढीमुळे बाजारात चिंतेचे वातावरण असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. अशा परिस्थितीत बाजारातील कोणत्याही तेजीवर नफा बुकिंग (Profit Booking) करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

एलआयसीचे बाजार भांडवल घसरले

मागील 14 ट्रेडिंग सत्रात एलआयसीचे बाजार भांडवल कमी झाले असून एलआयसी गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी गमावले आहे. आयपीओनुसार अप्पर बँण्डच्या हिशोबाने एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 6 लाख 242 कोटी रुपये होते मात्र आता एलआयसीचे बाजार भांडवल 5 लाख सहा हजार 126 कोटी रुपयांवर आले. म्हणजेच एलआयसीच्या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : छत्रपती संभाजी नगरमधल्या मतदान केंद्रावर EVM मशीन बंद

China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

Latest Marathi News Live Update : मुंबई- गोवा महामार्गावर एक तासापासून वाहतूक कोंडी

Gautam Gambhir: 'KKR मध्ये सूर्यकुमारच्या क्षमतेचा योग्य वापर...', गौतम गंभीरने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

Sandalwood Oil : उजळ त्वचेसाठी अन् सुरकुत्यांना घालवण्यासाठी चंदनाचे तेल आहे फायदेशीर, असा करा वापर

SCROLL FOR NEXT