Share Market Latest News Updates sakal
अर्थविश्व

LIC IPO: गुंतवणूकीच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात आठवडयाच्या पहिल्याच दिवशी घसरण पाहायला मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात आठवडयाच्या पहिल्याच दिवशी घसरण पाहायला मिळाली. सुरवातीच्या सत्रातील घसरण दिवसभर कायम होती.आज सेन्सेक्स 365 अंकानी खाली गेला तर निफ्टी 16,300 वर बंद झाली. विशेष म्हणजे LIC चा IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस होता.

सेन्सेक्स 365 अंकानी घसरुन 54470.67 वर होता तर निफ्टी 109.40 अंकांनी घसरून 16301.90 वर कायम होती. आज मार्केटमध्ये सुमारे 1036 शेअर्स वाढले आहेत तर 2353 शेअर्समध्ये घट झाली. (Share Market closing update 9 may 2022)

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 846.86 अंकांनी घसरला होता तर निफ्टी 16,250 च्या खाली गेली होती. आज शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली.

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.

देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस होता. LIC चा IPO आज म्हणजेच सोमवारी बंद झाला. 4 मे रोजी IPO ची सुरवात झाली होती. विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी देखील बोली घेण्यात आली. देशातील आयपीओ मार्केटमध्‍ये एखाद्या कंपनीचा आयपीओ सहा दिवस सुरू असल्याची कदाचित ही पहिलीच वेळ म्हणता येईल. रविवारपर्यंत 1.79 पट LIC IPO सबस्क्रिप्शन मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT