Share Market Opening
Share Market Opening esakal
अर्थविश्व

Share Market Opening: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

सकाळ डिजिटल टीम

Share Market: कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि चांगल्या जागतिक संकेतांमुळे बेंचमार्क इंडेक्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे 18,000 आणि 60,000 अंकांच्या वर बंद झाले. बाजाराने सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढीचा कल कायम ठेवला. शेवटी सेन्सेक्स 786.74 अंकांनी अर्थात 1.31% वाढून 60,746.59 वर बंद झाला. निफ्टी 225.40 अंकांनी अर्थात 1.27% वाढून 18,012.20 वर बंद झाला. निफ्टी ऑटो, इन्फ्रा, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि फार्मासह सर्व क्षेत्रीय इंडेक्स प्रत्येकी 1-1 टक्क्यांनी वाढले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीने सोमवारी उच्च पातळीवर आपली रेंज शिफ्ट केल्याचे बीएनपी पारिबसचे गौरव रत्नपारखी म्हणाले. गेल्या आठवड्यापर्यंत, 17,800 ची पातळी रझिस्टंस म्हणून काम करत होती. मात्र, सोमवारी गॅप अप ओपनिंगसह इंडेक्सने हा रझिस्टंस पार केल्याचे ते म्हणाले. (Share Market)

निफ्टीने आता उच्च पातळीच्या पुढील रझिस्टंस झोनमध्ये प्रवेश केला आहे. हा झोन 18,000-18,100 च्या दरम्यान आहे. या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये इंडेक्स या झोनजवळ घसरला. अशा स्थितीत निफ्टीमध्ये पुन्हा या पातळीवर सावध राहण्याची गरज आहे.

तांत्रिकदृष्ट्या निफ्टीने बुलिश कँडल आणि हायर बॉटम फॉर्मेशन तयार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. हे आता नजीकच्या काळात तेजीचा ट्रेंड सुरू ठेवण्याचे संकेत देत आहे. जोपर्यंत इंडेक्स 17,900 च्या वर व्यापार करत आहे तोपर्यंत अपट्रेंड फॉर्मेशन कायम राहण्याची शक्यता आहे. याच्या वर गेल्यास निफ्टी 18,100-18,150 च्या पातळीला स्पर्श करू शकतो असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

आयशर मोटर्स (EICHERMOT)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

एटडीएफसी (HDFC)

एल अँड टी (LT)

ट्रेंट (TRENT)

ऍस्ट्रल (ASTRAL)

इंडियन हॉटेल (INDHOTEL)

एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICU मध्ये आजारी वडिलांसमोर लागले दोन मुलींचे लग्न, डॉक्टर-नर्स झाले वराती, नंतर... डोळे पाणावणारी घटना

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले! केंद्रीय गृहमंऱ्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावत घेतला परिस्थितीचा आढावा

SAKAL Impact : ..अखेर वेळेपूर्वीच व्हीपीयू वॅगन फलाटावर; निंभोरा रेल्वेस्थानकावरून केळी रेक दिल्लीकडे

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

SCROLL FOR NEXT