Share Market google
अर्थविश्व

Share Market : पीएनबीचे शेअर्स 21 महिन्यांच्या रेकॉर्डवर, सरकारच्या एका निर्णयाने शेअर्समध्ये तेजी....

पीएनबीची युटीआय एएमसीमध्ये 15.22 टक्के हिस्सेदारी आहे आणि त्याला संपूर्ण स्टेक विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नमिता धुरी

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेचे (Punjab National Bank) शेअर्स शुक्रवारी जवळपास 8 टक्क्यांनी वाढून बीएसईवर 55.65 रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचले. फेब्रुवारी 2020 नंतरचा हा विक्रमी उच्चांक आहे.

सरकारच्या एका मंजुरीमुळे बँकेच्या शेअर्सची खरेदी वाढली. यूटीआय ऍसेट मॅनेजमेंट कंपनीमधील (UTI AMC) तिचा संपूर्ण हिस्सा पीएनबीला विकण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे यूटीआय एएमसीच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. युटीआय एमएससीचे शेअर्स शुक्रवारी इंट्रा-डेमध्ये सात टक्क्यांनी वाढून 751.2 रुपयांवर पोहोचले

युटीआय एएमसीमधील संपूर्ण हिस्सा विकण्यासाठी बँकेला DIPAM अर्थात डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंटकडून मंजुरी मिळाल्याचे पीएनबीने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे.

DIPAM हा वित्त मंत्रालयाचा एक विभाग आहे जो केंद्र सरकारच्या इक्विटी गुंतवणुकीशी संबंधित काम करतो. पीएनबीची युटीआय एएमसीमध्ये 15.22 टक्के हिस्सेदारी आहे आणि त्याला संपूर्ण स्टेक विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. युटीआय एएमसीमध्ये बँकेची हिस्सेदारी सुमारे 1,300 कोटी रुपयांची आहे.

केअर रेटिंग्सने (CARE Ratings) बँकेच्या AT-1, टियर 2 बाँड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्सचे रेटिंग स्टेबलवरून पॉझिटिव्ह केले आहे. केअर रेटिंगच्या विश्लेषकांनी पीएनबीला सरकारी सपोर्ट मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पीएनबीमध्ये सरकारची 73.15 टक्के हिस्सेदारी आहे. व्यवसायाच्या दृष्टीने ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT