Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

शिल्पा गुजर

Share Market: शुक्रवारी भारतीय बाजारांनी जोरदार पुनरागमन केले. बाजाराला चांगले जागतिक संकेत आणि खरेदीचा पाठिंबा मिळाल्याने ही रिकव्हरी झाली. सेन्सेक्स 1534.16 अंकांच्या म्हणजेच 2.91 टक्क्यांच्या वाढीसह 54,326.39 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 456.75 अंकांच्या अर्थात 2.89 टक्क्यांच्या वाढीसह 16,266.15 वर बंद झाला.

बाजार शुक्रवारी आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. जागतिक बाजार विशेषत: आशियाई बाजारातील मजबूतीमुळे भारतीय बाजारांमध्येही उत्साह दिसून आला. चीनच्या सेंट्रल बँकेने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात केली असून, त्यामुळे इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही आशेचा किरण दिसून आला आहे. मात्र मंदी आणि व्याजदर वाढीची भीती अजूनही कायम आहे,

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?
गेल्या 2 आठवड्यांच्या मोठ्या घसरणीनंतर बाजार या शुक्रवारी सकारात्मक नोटांसह बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. मात्र, जागतिक बाजारातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारातही अस्थिरता पाहायला मिळाली. बाजारात एफआयआयची विक्री सुरू आहे. जगभरातील वाढत्या महागाईमुळे बाजार चिंतेत असल्याचे दिसते. निकालांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अशा स्थितीत आता बाजाराचे लक्ष मॅक्रो डेटावर असेल. वाढत्या महागाईच्या काळात, जगातील सर्व मध्यवर्ती बँकांनी कठोर निर्णय घेतल्याने वातावरण अस्थिर आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्सच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बाजारात पुन्हा तेजी आल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तापसी म्हणाले. यूएस ट्रेझरी बाँड यील्ड आणि डॉलर निर्देशांकातील घसरणीचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. बाजारातील चौफेर खरेदी हे देखील चांगले लक्षण आहे. आता निफ्टीचा पुढील प्रतिकार 16411 वर दिसत आहे. नकारात्मक बाजूने, 15951 वर सपोर्ट आहे. जर हा तुटला, तर आणखी घसरण येऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
डॉ. रेड्डी (DRREDDY)
रिलायन्स (RELIANCE)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
ट्रेंट (TRENT)
ए यू बँक (AUBANK)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT