Vaibhav Jewellers sakal
अर्थविश्व

IPO: लवकरच येतोय वैभव ज्वेलर्सचा आयपीओ, सेबीकडे अर्ज दाखल

या आयपीओमध्ये 210 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असेल तर 43 लाख शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल.

सकाळ डिजिटल टीम

मनोज वैभव जेम्स 'एन' ज्वेलर्स लिमिटेडने (Manoj Vaibhav Gems 'N' Jewellers Ltd) सेबीकडे आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. मनोज वैभव हे वैभव ज्वेलर्स म्हणूनही ओळखले जातात. या आयपीओमध्ये 210 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असेल तर 43 लाख शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल. बजाज कॅपिटल (Bajaj Capital) आणि एलारा कॅपिटल (Elara Capital) हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

या ऑफर फॉर सेल अंतर्गत, कंपनीचे प्रमोटर ग्रँडी भारत मल्लिका रत्न कुमारी (Grandhi Bharata Mallika Ratna Kumari (HUF) त्यांचे 43 लाख शेअर्स विकणार आहेत. सध्या ग्रँडी भारत मल्लिका रत्न कुमारी यांच्याकडे कंपनीत 75.10 टक्के हिस्सा आहे

आयपीओमधून मिळालेले पैसे नवीन स्टोअररुम उघडण्यासाठी वापरले जाईल. याशिवाय 12 कोटी रुपये 8 रिटेल आउटलेटच्या विस्तारासाठी तर 160 कोटी रुपये इन्व्हेंटरीसाठी वापरण्यात येणार आहेत.

वैभव ज्वेलर्स हा दक्षिण भारतातील मोठा ज्वेलरी ब्रँड आहे. कंपनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणापुरती मर्यादित आहे. इथे 13 शोरूम आहेत. यापैकी 2 चायनीज शोरूम आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील दागिन्यांच्या बाजारपेठेत कंपनीचा वाटा 5 टक्के आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये FY 2023-24 पर्यंत नवीन स्टोअर्स उघडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये, कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 1433.57 कोटी रुपयांवरून 1693.92 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. त्याचप्रमाणे, याच कालावधीतील नफा वार्षिक आधारावर 20.74 कोटी रुपयांवरून 43.68 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. EBITDA मार्जिन वार्षिक 4.85 टक्क्यांवरून 6.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीवर एकूण थकीत कर्ज 458.53 कोटी रुपये होते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT