Share market power sector  esakal
अर्थविश्व

Share Market: पॉवर सेक्टरचा 'हा' शेअर तुमचा पोर्टफोलिओ करेल दमदार

संदीप जैन यांनी शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देणारा मजबूत स्टॉक तुमच्यासाठी निवडला आहे

सकाळ डिजिटल टीम

Power Sector: शेअर बाजारात सध्या घसरणीचा काळ सुरु आहे. अशात फार नुकसान न होता असे कोणते शेअर आहेत जे तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळेच तुम्ही बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी करू शकता. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देणारा मजबूत स्टॉक तुमच्यासाठी निवडला आहे आणि त्यात गुंतवणूक करायचा सल्ला दिला आहे.

मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडची (Voltamp Transformers Ltd) निवड केली आहे आणि गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. जैन यांच्या दृष्टीने ही सर्वोत्तम दर्जाची कंपनी आहे. सध्या शेअर बाजारात पॉवर शेअर्स जोरदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे हा शेअर तुम्हाला चांगला नफा कमावून देऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडची (Voltamp Transformers Ltd)

सीएमपी (CMP) - 2608 रुपये

टारगेट (Target) - 2790/2850 रुपये

व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड (Voltamp Transformers Ltd) कंपनीला AA रेटिंग मिळाले आहे. ही कंपनी 1967 पासून कार्यरत आहे. व्होल्टॅम्प मोठे ट्रान्सफॉर्मर बनवते. याशिवाय या कंपनीचे एका जर्मन कंपनीसोबत टेक्निकल कोलाबरेशन आहे.

कंपनीचे फंडामेंटल्स ?

व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड (Voltamp Transformers Ltd) ही कंपनी शून्य कर्ज असलेली कंपनी आहे आणि गेल्या 3 वर्षातील कंपनीच्या नफ्याचा CAGR 16 टक्के असल्याचे मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी सांगितले की. याशिवाय, गेल्या 5 वर्षांच्या विक्रीचा CAGR सुमारे 13 टक्के आहे. कंपनीचा डिव्हिडेंड यील्ड सुमारे 1.5 टक्के आहे.

तिमाही निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, जून 2021 मध्ये कंपनीने 16 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर जून 2022 मध्ये कंपनीने 27 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता. या शेअर्समध्ये प्रमोटर्सचे शेअर होल्डिंग चांगले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT