ITC esakal
अर्थविश्व

ITC Share: 3 दिवसांत 11 टक्क्यांची वाढ! 52आठवड्यात उच्चांकावर शेअर्स

सकाऴ वृत्तसेवा

गेल्या तीन दिवसांत ITC चे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले आहेत, तर बीएसई इंडेक्स सेन्सेक्स या काळात फक्त 1.8 टक्के वाढला आहे.

- शिल्पा गुजर

आयटीसीच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली. सोमवारी, ITC चे शेअर्स 1.12 टक्क्यांनी वाढून 233.75 रुपयांवर बंद झाले. इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान, शेअरची किंमत 3.5 टक्क्याने वाढून 239.40 रुपये झाली, जी 52 आठवड्यांची उच्चतम (High) पातळी आहे. याआधी, ITC चा 52 आठवड्यांचा उच्चांक 239.40 होता, जो 9 फेब्रुवारी 2021 ला पोहोचला होता.

गेल्या तीन दिवसांत ITC चे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले आहेत, तर बीएसई इंडेक्स सेन्सेक्स या काळात फक्त 1.8 टक्के वाढला आहे. अनेक तज्ज्ञांनी आयटीसी शेअर्सना खरेदीचे रेटिंग (Buy Rating) दिले आहे. ITC चे शेअर्स 250 रुपयांच्या पातळीवर जाण्याची अपेक्षा असल्याचा विश्वास तज्ज्ञांना आहे. जो सध्याच्या किंमतीपेक्षा 4.4 टक्क्यांनी जास्त आहे. आयटीसीची सिगारेट विक्री आणि कमाई पुनर्प्राप्तीच्या (Recovery) मार्गावर असल्याचे ग्लोबल ब्रोकरेज फर्मने सोमवारी जारी केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे. सोबतच कंपनी आगामी तिमाहीत चांगले परिणाम नोंदवू शकते. कंपनीचे शेअर्स सध्या चांगल्या स्थानावर आहेत आणि त्यामध्ये सुमारे 5 टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचेही ग्लोबल ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे.

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सिगारेट आणि तंबाखूवर कोणताही अतिरिक्त कर किंवा सेस जाहीर करण्यात आला नाही, त्यामुळे आयटीसीला फायदा होईल, असे ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. ब्रोकरेज फर्मने आयटीसीवरील आऊटफॉर्म रेटिंग कायम ठेवली आहे आणि शेअर्सचे लक्ष्य (Target) 275 रुपयांवरून 300 रुपये केली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे आयटीसीच्या सिगारेट विक्रीवर परिणाम झाला. दोन वर्षापूर्वीच्या तुलनेत त्यात 21 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, आर्थिक निर्बंध हटवल्यानंतर त्यात तेजी दिसून येत आहे. यामुळे आयटीसीचे शेअर्स सतत वाढत आहेत.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT