Jaquar family Google file photo
अर्थविश्व

Success Story: तीन पिढ्यांचे ‘जॅक्वार’!

सुवर्णा येनपुरे कामठे

हल्ली प्रत्येकालाच सोयीसुविंधानी भरलेले घर हवे असते. त्यातच आपले नवे घर असेल, तर त्याच्या आतील फिटिंग्स ब्रँडेड केलेल्या आहेत की नाही, हे आपण आवर्जून पाहतो. अनेक बिल्डर आपल्या घरांची जाहिरात करताना सोयीसुविधा कोणत्या आहेत, हे आवर्जून सांगत असतात. त्यातील एक वाक्य म्हणजे ‘जॅक्वार बाथरूम फिटींग्स’!

मुळात एखाद्या ब्रँडची सुरवात कशी होते किंवा एखाद्या वस्तूला ब्रँड म्हणून का संबोधले जाते, या प्रश्नाचे उत्तर आहे, त्याच्या विश्वासार्हतेमुळे! एखाद्या वस्तूने आपल्या टिकाऊपणाचा अनेक वर्षांचा विश्वास दिला, की मग त्याचे रुपांतर हळूहळू ब्रँडमध्ये होऊ लागते.

‘जॅक्वार’ ही ब्रँडेड बाथरूम आणि लायटिंग उत्पादने बनविणारी कंपनी बनण्यापूर्वी ती एक स्थानिक कंपनी होती. दिवंगत एन.एल. मेहरा यांनी १९६० मध्ये दिल्लीमध्ये बाथरूम फिटिंगचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यांना हा व्यवसाय करणे कठीण काम असेल, याची कल्पना नव्हती. त्यावेळी नळ, स्पॉट्स आणि व्हॉल्व्ह हा एक नवा उद्योग होता. ब्रँडेड बाथरूम फिटिंगचे मूल्य त्यावेळी कोणीही ओळखले नव्हते. मेहरा यांनी ‘एस्को’ नावाचा ब्रँड बाजारात आणला आणि बाथरूम फिटिंगच्या अत्यंत असंघटित बाजारात त्याची ‘ब्रँड व्हॅल्यू’ तयार करायला सुरवात केली. त्यांनी हरियानामध्ये ‘एस्को’ची उत्पादने तयार करणारे युनिट बनविले आणि दहा वर्षांच्या वॉरंटीने त्यांची विक्री करायला सुरवात केली. त्यावेळी व्यावहारिकदृष्ट्या न ऐकलेली ही योजना होती, कारण त्यावेळेस विनाब्रँड बाथ फिटिंग्जची सेवा देणाऱ्या कंपन्या होत्या आणि त्यांना कमी दर्जासाठी जबाबदार धरले जात नव्हते. या ग्राहककेंद्रित पद्धतीमुळे ‘एस्को’ ब्रँड बाजारात प्रसिद्ध झाला व १९८५ पर्यंत त्याचा व्यवसाय ३० लाख रुपयांवर पोचला.

सध्या या व्यवसायात मेहरा यांची तिसरी पिढी कार्यरत आहे. कंपनीचे हिंदवेअर, पॅरिवेअर, सेरा सॅनिटरी वेअर, एस्को असे अनेक नावाजलेले ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीचे नामकरण १९८६ मध्ये मेहरा यांची मुले राजेश मेहरा, अजय मेहरा आणि एस. के. मेहरा यांनी ‘जॅक्वार’ म्हणून केले. हे नाव आई जय कौर आणि एक्वा या शब्दापासून तयार करण्यात आले.

‘जॅक्वार’ समूहाला प्रसिद्धी मिळाली असली, तरी खरी गती ही ९० च्या शतकात प्राप्त झाली. या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी विविधता आणली पाहिजे, याची गरज या समूहाच्या दुसऱ्या पिढीने ओळखली. त्याप्रमाणे वॉटर हीटर, सॅनिटरी वेअर अशा अनेक उत्पादनांची जोड देण्यात आली. कंपनी ४५ देशांमध्ये आपली उत्पादने विकते. सध्या कंपनीची उलाढाल ३६०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर!

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT