Share
Share Sakal
अर्थविश्व

गुंतवणुकीचा विचार करता 'या' दोन गोष्टींचा समतोल साधणे गरजेचा

प्रकाश सनपूरकर

सर्वसाधारणपणे बचतीचे परतावे हे महागाई दरापेक्षा अधिक रकमेचे असणे आवश्‍यक आहे.

सोलापूर : आपली बचत ही महागाई दराच्या तुलनेत अधिक परतावा देणारी आहे का? या मुद्‌द्‌याचे उत्तर शोधणारा फंडा आता बचतीच्या क्षेत्रात ऐरणीवर येत आहे. वयानुसार व ठरविलेल्या ध्येयानुसार गरजांचे विश्‍लेषण करत त्यानुसार बचत परताव्याचे नियोजनाचा फंडा आर्थिक सल्लागाराकडून मांडला जाऊ लागला आहे. सर्वसाधारणपणे बचतीचे परतावे हे महागाई दरापेक्षा अधिक रकमेचे असणे आवश्‍यक आहे. तरच ही बचत मदतीसाठी उपयोगाला येऊ शकते. महागाई दर ओलांडणारी बचत रकमेत वाढ करणारी ठरते. तसेच वाढत्या दराच्या गरजा भागवूनदेखील मुळ बचत रकमेत नंतर वाढ करता येते.

गरजेचे प्रकार

गरजेचा खर्च वस्तू : जसे किराणा, दूध व दैनंदिन खर्च हे होय. यामधील वस्तूंच्या दरामध्ये फारसा मोठा फरक न पडता ते महागाई दराने वाढतात. म्हणजे महागाईतील वाढ 6 टक्के एवढीच असते. या वस्तूंसाठी केवळ नियमित उत्पन्नातील वाढ उपयुक्त ठरते.

आवडीच्या वस्तू : यामध्ये सर्वसाधारणपणे केवळ आवड असलेल्या चैनीच्या वस्तू म्हणजे मोबाइल, कार यासारख्या वस्तूंचा समावेश होतो. या वस्तूंच्या किंमती या महागाई दराच्या तुलनेत अधिक दराने वाढत असतात. ही दरवाढ 10- 12 टक्के असू शकते. त्यामुळे या खरेदीला बचतीचे पारंपरिक उपाय अपुरे पडू शकतात. त्यासाठी किमान दहा टक्केपेक्षा अधिक परतावा देणाऱ्या बचतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शिक्षण : शिक्षणाच्या दरात होणारी वाढ ही खूप अधिक आहे. उच्च शिक्षणाची दरवाढ 12 टक्‍क्‍यापर्यंत वाढीव असू शकते. किंवा शिक्षणाच्या पहिल्या इयत्तेपासून ही दरवाढ हळूहळू 12 टक्‍क्‍यापेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे शिक्षणाला देखील पारंपरिक बचत योजना अपुऱ्या पडतात.

आरोग्य : आरोग्याच्या सेवांची दरवाढदेखील 10 टक्‍क्‍यापेक्षा अधिक आहे. महागाई किंवा बचतीचे नियम आकस्मिक आरोग्य संकटाला लागूच होत नाहीत. मात्र आकस्मिक खर्च करावा लागत असल्याने त्याला बचतीच्या तुलनेत रिस्क कव्हर करणाऱ्या विमा योजना मदत करणाऱ्या ठरतात.

गुंतवणूकीचे प्रकार

1. किमान एक वर्षाची गुंतवणूक : ही अंत्यत कमी कालावधीची गुंतवणूक आहे. यामध्ये सुरक्षिततेला महत्व दिले जाते. त्यासाठी अगदी बॅंकेच्या योजना, ठेवीचे प्रकार उपयुक्त ठरतात. ही बचत महागाई दर म्हणजे 6 टक्केच्या जवळपास असली तरी उपयुक्त ठरते. बचत खात्यात या रकमेला सर्वात कमी व्याज मिळते म्हणून अधिक आकर्षक ठेव योजना वापरणे सोयीचे आहे.

2. दीर्घ कालावधीची गुंतवणूक : या कालवधीत बचतीला निश्‍चितपणे महागाई दरापेक्षा अधिक परताव्याचे पर्याय असणाऱ्या योजना शोधणे आवश्‍यक आहे. यामध्ये सीप डेट फंडमधील ठेव योजना, बॅंका, पोस्ट व विम्यातील 6 टक्केपेक्षा अधिक परतावे देणाऱ्या योजनांचा उपयोग करता येतो. या योजनेतून 6 टक्के महागाई दर अधिक दरडोई उत्पन्नवाढीचा दर (जीडीपी) 6 टक्के असे परतावे मिळवणे योग्य आहे.

3. निवृत्त कालावधीची गुंतवणूक :

अ. निवृत्तीची रक्कम मिळणार नसेल तर आधीपासून पेन्शन प्लॉनची गुंतवणूक इक्विटी फंड व आरोग्य विम्यासाठी करणे उपयुक्त ठरते.

ब. निवृत्तीचे रक्कम हाती येणार असेल तर या रकमेचे विभाजन दोन भागात करणे योग्य असते. रकमेचा 70 टक्के रक्कम ही सुरक्षित गुंतवणूक व आरोग्य विमा संरक्षणासाठी करायला हवी. रकमेची 30 टक्के रक्कम ही महागाई दरापेक्षा अधिक परतावा देणाऱ्या योजनेत करायला हवी.

- आपली बचत ही महागाई दर जो की 6 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे त्यापेक्षा अधिक परताव्याची असावी

- आरोग्याच्या बाबतीत आकस्मिक खर्चाचे संरक्षणात गुंतवणूक हवीच

- आवडीच्या वस्तू घेण्यासाठी मोठा परतावा देणाऱ्या गुंतवणूकीतून लाभ मिळवावेत.

- गरजेपुरत्या खर्चासाठी केवळ महागाई दर तोलणारी बचत पुरेशी

- अत्यावश्‍यक व आवडीच्या गरजांचे विश्‍लेषण करून आर्थिक नियोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT