shares google
अर्थविश्व

दोन वर्षांत 376.40 रुपयांवरुन हा शेअर पोहोचला 3000 रुपयांवर, अजुनही तेजीचा कल...

शेअरची 3080 रुपयांचा उच्चांक आहे तर बीएसईवर निचांक 1142.85 रुपयांवर आहे.

नमिता धुरी

शेअर मार्केटमध्ये असे बरेच शेअर्स आहेत ज्यांनी अवघ्या 2 वर्षात गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. असाच एक स्टॉक आहे. पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेडचा (PTC Industries Limited). पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी क्रिटीकल आणि सुपर-क्रिटिकल ऑपरेशन्ससाठी हाय-क्वालिटी इंजिनिअरिंग कंपोनंट्स तयार करते.

कंपनी तेल, वायू आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस, ऑफशोअर अँड मरीन, वॉल्व अँड फ्लो कंट्रोल, पॉवर प्लांट्स आणि टर्बाइन्स, पल्प आणि पेपर उद्योगांमध्ये इंडस्ट्रियल एप्लिकेशन्ससाठी उत्पादनांची प्रॉडक्ट्स बनवते.

कंपनीच्या एकूण विक्रीपैकी 48 टक्के विक्री युरोपियन युनियनमधून, 19 टक्के भारतातून, 17 टक्के अमेरिकेतून, 11 टक्के चीनमधून आणि इतर जगातून येते. कंपनीचे उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये दोन मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स आहेत. तसेच, कंपनीकडे डीएसआयआरकडून अप्रूव्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब आहे.

17 नोव्हेंबर 2022 रोजी पीटीसी इंडस्ट्रीजचे शेअर 3000 रुपयावर ट्रे़ड करत आहे. गेल्या दोन वर्षांत हा शेअर सुमारे 700 टक्क्यांनी वाढला आहे. 17 नोव्हेंबर 2020 रोजी त्याची किंमत 376.40 रुपये होती. आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत, स्टँडअलोन बेसिसवर कंपनीचा नेट रेव्हेन्यू 41.13 टक्क्यांनी वाढून 54.04 कोटी रुपये झाला आहे.

कंपनीचा करानंतरचा नफाही 309.44 टक्क्यांनी वाढून 7.37 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा आरओई 8.64 टक्के आणि आरओसीई 9.63 टक्के आहे. पीटीसी इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 3,929.30 कोटी आहे. शेअरची 3080 रुपयांचा उच्चांक आहे तर बीएसईवर निचांक 1142.85 रुपयांवर आहे. या शेअरमध्ये येत्या काळात आणखी तेजीचा विश्वास असल्याने मार्केट एक्सपर्ट यामध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT