Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: या टायर कंपनीकडून मोठा रिटर्न, गुंतवणुकदारांची चांदी...

गुंतवणूक करत असाल तर या कंपनीत करा, मिळेल लाखो रिटर्न

सकाळ डिजिटल टीम

टायर बनवणारी कंपनी एमआरएफ अर्थात मद्रास रबर फॅक्टरीच्या (MRF) शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. गेल्या वीस वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात सुमारे 9800 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एमआरएफचे शेअर्स यंदा 11 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. हा देशातील सर्वात महाग स्टॉक आहे. त्याची सध्याची किंमत 82297.70 रुपये आहे. त्याची मार्केट कॅप 34,903.63 कोटी रुपये आहे.

एमआरएफचे शेअर्स 18 ऑक्टोबर 2002 रोजी 841.10 रुपयांवर होते, जे 20 वर्षांत वाढून 17 ऑक्टोबर 2022 रोजी 82297.70 रुपयांपर्यंत पोहोचलेत. याचा अर्थ असा की सुमारे 20 वर्षांपूर्वी एमआरएफमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आत्तापर्यंत सुमारे 98 लाख रुपये झाले असते.

एमआरएफचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर सिद्ध झाले आहेत. लाँग टर्म असो की शॉर्ट टर्म दोन्ही काळात एमआरएफने त्याच्या गुंतवणुकदारांना कधीही निराश केलेले नाही. यावर्षी, 24 फेब्रुवारी 2022 रोजी, तो 63 हजार रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला होता. त्यानंतर त्यात वेग आला आणि 15 सप्टेंबर 2022 पर्यंत तो सुमारे 49 टक्क्यांनी वाढून 93887 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे. त्यानंतर त्यात पुन्हा थोडी घसरण झाली आणि सध्या तो उच्चांकावरून 12 टक्के सूटवर मिळत आहे.

एमआरएफ ही देशातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे. कंपनी प्रवासी कार, दुचाकी, ओटीआर आणि ट्रकसाठी टायर बनवते आणि विकते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एमआरएफचा निव्वळ नफा तिमाही आधारावर कमी झाला आहे, पण महसूल वाढला आहे. त्याचा निव्वळ नफा एप्रिल-जून 2022 मध्ये 156.78 कोटी रुपयांवरून 112.36 कोटी रुपयांवर घसरला, तर त्याच कालावधीत महसूल 5200.29 कोटी रुपयांवरून 5598.92 कोटी रुपयांवर पोहोचला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT