Gold price Updates
Gold price Updates SAKAL
अर्थविश्व

Gold Price Today: सोने महागले, जाणून घ्या आजचे नवीन दर

सकाळ डिजिटल टीम

सध्या लग्नसंमारंभाची चाहूल लागली आहे. अशात सोने महागणार, हे तितकेच खरं आहे. लग्नसंमारंभामुळे सोन्याची मागणी वाढली आहे त्यामुळे सोन्याचा दरही वाढलेला आहे. आज १ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी ४,९०० आहे तर २४ कॅरेट सोन्यासाठी ५,३४५ आहे. १२ एप्रिलच्या तुलनेत २२ कॅरेट सोने ४० रुपयांनी तर २४ कॅरेट सोने ४३ रुपयांनी वाढले. (todays gold rate update)

गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली. सोन्याचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक वर्षापूर्वी २४ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७,८९० रुपये इतकी होती. आज २४ कॅरट सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.

भारतीय सुवर्ण बाजारात ऑगस्ट २०२० मध्ये सोने आपल्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. सोन्याची किंमत प्रति तोळा ५६,२०० रुपये इतकी झाली होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या घसरणीला आता ब्रेक लागला असून, पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.

ग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) सोमवारी सोन्याच्या दर १.५ टक्क्यांनी वाढून, १,९९८.३७ डॉलर प्रति औंसवर पोहोचला तर सोन्याच्या किमतीवर रशिया आणि युक्रेन युद्धाचा देखील परिणाम झाला असून, सध्या दरामध्ये चढ -उतार पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT