Today's Gold, Silver Price Updates
Today's Gold, Silver Price Updates esakal
अर्थविश्व

सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सकाळ डिजिटल टीम

Todays Gold Silver Update: गेल्या काही दिवसापासून सोने चांदीचे दर कमी जास्त होत आहे. बुधवारच्या घसरणीला ब्रेक लागून आज सोने चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,400 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,040 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर वाढून आज 621 रूपयावर चांदी आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 52,100 रुपये

दिल्ली - 52,040 रुपये

हैदराबाद -52,040 रुपये

कोलकत्ता - 52,040 रुपये

लखनऊ - 52,190 रुपये

मुंबई - 52,040 रुपये

नागपूर - 52,090 रुपये

पूणे - 52,090 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT